Maratha Kranti Morcha esakal
महाराष्ट्र बातम्या

Maratha Community : राज्यभरात विक्रमी 57 मोर्चे निघाले अन् 2016 नंतर बदलला मराठा समाज; पण अद्यापही आरक्षण नाही!

मराठा समाजाने (Maratha Community) राज्यात सात वर्षांपूर्वी विक्रमी सहभागाने ५७ मोर्चे काढले.

बलराज पवार

मराठा समाज रुढी-परंपरा, कर्मकांडात अडकलेला. मात्र सात वर्षांत समाज रुढी-परंपरेतून बाहेर पडत आहे.

सांगली : मराठा समाजाने (Maratha Community) राज्यात सात वर्षांपूर्वी विक्रमी सहभागाने ५७ मोर्चे काढले. या आंदोलनाने आरक्षण (Maratha Reservation) अद्याप मिळाले नसले तरी समाज अंतर्बाह्य बदलत आहे. गावकी-भावकीत अडकलेला समाज स्वतःच्या प्रगतीसाठी एकत्र येऊन संघर्ष करीत असल्याचे चित्र आहे.

मराठा बहुसंख्याक असला तरी तो भावकी, राजकारण, पक्ष, संघटना यात विखुरल्याचे चित्र काही वर्षांपूर्वी होते. पारंपरिक शेती व्यवसायही जमिनीच्या तुकड्याने अडचणीत आला. आर्थिक, शैक्षणिक मागासलेपणामुळे समाजात अस्वस्थता होती. नेतृत्व करणाऱ्यांनी सहकारी क्षेत्रात कारखाने, दूध संघ, सोसायट्या सुरू केल्या.

उदारीकरण व खासगीकरणानंतर मात्र २०-२५ वर्षांत सहकार क्षेत्रही धोक्यात आले. समाजाची अधोगती वेगाने सुरू झाली. तरुण पिढी सैरभर झाल्याचे चित्र होते. नेत्यांचे नुकसान झाले. ज्या सहकार क्षेत्रावर त्यांची मदार होती, तोच मोडून पडल्याने समाज सावरता आला नाही. गेल्या वीस वर्षांत नैसर्गिक आपत्तीने शेतीतून आर्थिक उत्पन्नालाही फटका बसला. युवा पिढीपुढे आर्थिक संकट उभे ठाकले. याचा परिणाम म्हणून समाजात मोठ्या प्रमाणात अस्वस्थता निर्माण झाली.

समाजाला आरक्षणाची गरज भासू लागली. पंधरा वर्षांत या मागणीने खूपच जोर धरला. दोन वेळा जाहीर झालेले आरक्षण रद्द झाले. कोपर्डी येथील घटनेनंतर सात वर्षांपूर्वी समाज त्वेषाने रस्त्यावर आला. सन २०१६ मध्ये कोपर्डी घटनेतील आरोपींना फाशी, मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अशा मागण्या घेऊन राज्यभरात प्रचंड संख्येने ५७ मोर्चे निघाले. मोर्चे शिस्तबद्ध, शांततेत निघाल्याने राज्यकर्त्यांनी दखलही घेतली. आरक्षण लटकलेलेच आहे. मात्र या मोर्चाचे एक चांगले फलित म्हणजे विखुरलेला समाज एकवटत आहे.

रुढी, परंपरा, कर्मकांडाला फाटा

मराठा समाज रुढी-परंपरा, कर्मकांडात अडकलेला. मात्र सात वर्षांत समाज रुढी-परंपरेतून बाहेर पडत आहे. कर्मकांडाला तिलांजली देत आहेत. अनेक तरुण पुढाकार घेत आहेत. सूतक पाच, तीन दिवसांवर आणले. त्याचबरोबर विवाहातील खर्च कमी करून सत्यशोधकीय, शिवविवाह विधींचा स्वीकार केला जात आहे. वेळ, श्रमाची बचत करीत मानसिकता बदलाचाही प्रयत्न सुरू झाला आहे.

एकमेकां साह्य करू..

समाज आता ‘एकमेकां साह्य करू’ या भूमिकेत आहे. तरुण नैराश्य झटकून उद्योग-व्यवसायासाठी एकत्र येत आहे. उद्योजक संघटना स्थापन करून मदतशील बनले आहेत. अल्पसंख्याक, परप्रांतीय समाजात असलेली एकमेकांना सहाकार्य करण्याची भूमिका मराठा समाजही स्वीकारत आहे. हे चित्र मराठा क्रांती मोर्चानंतर बदललेले प्रकर्षाने जाणवत आहे.

नोकरी, व्यवसायासाठी स्थलांतर

पारंपरिक शेतजमिनीचे तुकडे पडून अल्पभूधारक झाल्यानंतर मराठा तरुण शिक्षण घेऊन गावाबाहेर पडून मोठ्या शहरांकडे स्थलांतरित होत आहेत. सामाजिक, आर्थिक प्रगतीसाठी आरक्षण गरज असली तरी क्रांती एका रात्रीत होत नाही, हेही खरे. आरक्षण संधी असू शकते, साध्य नव्हे, याचे भान ठेवत समाज गेल्या सात वर्षांत कात टाकत असल्याचे चित्र आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Warning: "बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, मेहता-बिहतांनी..." ; मिरा भाईंदर व्यापार्‍यांच्या बंद नंतर मनसेचा आक्रमक इशारा!

Amit Shah : अमित शहा यांचे पुण्यात आगमन; अनेक कार्यक्रमांना उपस्थिती

Latest Maharashtra News Updates : वारजेत एका व्यक्तीकडून जिवंत काडतुसे आणि पिस्तुल जप्त

Asian Hockey Cup: क्रीडा मंत्रालयाकडून पाकला हिरवा कंदील; भारतात खेळण्याची परवानगी

Kolhapur Police : कोल्हापुरातील गुंडगिरी संपवण्यासाठी एसपी अॅक्शन मोडवर, कुचकोरवी उर्फ एस. के. गॅंगच्या १७ जणांना केलं हद्दपार

SCROLL FOR NEXT