Gunratn sadavarte  
महाराष्ट्र बातम्या

Gunratna Sadavarte:गुणरत्न सदावर्ते यांच्या गाड्यांची तोडफोड, मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांना अटक

मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या गुणरत्न सदावर्ते यांच्या दोन गाड्यांची मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांकडून तोडफोड करण्यात आली.

Manoj Bhalerao

Gunratna Sadavarte:मुंबईतील क्रिस्टल टॉवर परिसरात मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांकडून वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. ही घटना गुरुवारी (दि.२६ ऑक्टोबर) सकाळच्या सुमारास घडली. यावेळी कार्यकर्त्यांनी गाड्यांची तोडफोड करताना 'एक मराठा लाख मराठा'अशा घोषणा दिल्या.

मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे यांनी मराठा आंदोलकांना शांततेच्या मार्गाने आरक्षणाचा लढा सुरु ठेवण्याची भूमिका घेतली होती. मात्र, फुलंब्री गावातील काही तरुणांनी मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या गुणरत्न सदावर्ते यांच्या गाड्यांची तोडफोड केली. पोलिसांनी या तरुणांना ताब्यात घेतलं असून त्यांच्याविरोधात गुन्हा देखील दाखल केला जाऊ शकतो.

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तरुणांमधील एका तरुणांचं नाव मंगेश साबळे आहे. हा तरुण फुलंब्री गावाचा सरपंच देखील आहे. काही दिवसांपूर्वी मराठा आरक्षणासाठी या तरुणाने त्याची गाडी देखील पेटवून दिली होती.

मराठा आरक्षणाला विरोध केल्यामुळे गुणरत्न सदावर्ते यांच्यावर हल्ला होऊ शकतो, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर गुणरत्न सदावर्ते यांच्या सुरक्षेसाठी १० ते १२ पोलीस तैनात करण्यात आले होते.

गुणरत्न सदावर्ते यांनी मागच्या काही काळात मराठा आरक्षणाला विरोध केला होता, तशी वक्तव्यही त्यांनी केली होती. मराठा आरक्षणाला जेव्हा राज्य सरकारने मंजूरी दिली होती, तेव्हा सदावर्तेंनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. ज्यानंतर सुप्रीम कोर्टाने हे आरक्षण रद्द केलं होतं. त्यामुळे मराठा समाजाच्या तरुणांमध्ये सदावर्तेंबद्दल राग होता. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आमदार कल्याणशेट्टींना मिळणार वाढीव पोलिस बंदोबस्त! जीवे मारण्याच्या धमकीनंतर पोलिस अधीक्षक कार्यालयाने मागविला अक्कलकोट उत्तर पोलिसांकडून अहवाल, वाचा...

माझी भूमिका : ‘वैयक्तिक आयुष्यातही सकारात्मक बदल’

१३ ऑगस्ट २०२६ पंचांग! श्रावणमासाला आजपासून सुरुवात; जाणून घ्या शुभ-अशुभ वेळा

आजचे राशिभविष्य - 13 ऑगस्ट 2026

Green Moong Dal Ladoo: साखर-गूळ नाही तरी चव भन्नाट! असे बनवा हिरव्या मूगडाळीचे प्रोटीनयुक्त लाडू

SCROLL FOR NEXT