Maratha Reservation  esakal
महाराष्ट्र बातम्या

Maratha Reservation : संभाजी नगरमध्ये मराठा समाजाच्या बैठकीत राडा, दोन गटात हाणामारी; 'या' कारणामुळे झाला वाद

उमेदवार ठरवण्यावरुन वाद झाल्याने आता मनोज जरांगे पाटील काय निर्णय घेतता, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. मराठा समाजाच्या वतीने लोकसभा मतदारसंघांमध्ये उमेदवार देण्याचे निश्चित झालेलं आहे.

- प्रकाश बनकर

Loksabha Election 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने छत्रपती संभाजी नगरमध्ये मराठा समाजाच्या वतीने बैठक बोलावलेली होती. या बैठकीमध्ये मोठा राडा झाल्याची घटना घडली आहे. थेट मारामारी झाल्याने बैठकीला गालबोट लागलं आहे.

लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा समाजाच्या वतीने स्वतंत्र उमेदवार देण्यात येणार आहेत. राज्यातील १७ ते १८ मतदारसंघांमध्ये मराठा समाजाचं प्राबल्य असल्याने अपक्ष उमेदवार उभे करणार असल्याचं मनोज जरांगे यांनी जाहीर केलं आहे. त्याबाबतचा निर्णय ३० मार्च रोजी ते जाहीर करणार आहेत.

३० मार्चपूर्वी आपापल्या जिल्ह्यांमध्ये बैठका घेऊन उमेदवार निश्चित करावा, असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं होतं. त्यानुसार शुक्रवारी छत्रपती संभाजी नगरमध्ये बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये कुणीही कुणाचं नाव पुढे करायचं नाही, असं ठरलं होतं. परंतु काही जणांकडून उमेदवारीसाठी आपल्या जवळच्यांची नावं पुढे केली जात होती.

बैठकीत प्रोटोकॉल तोडल्यामुळे आणि काहींना तुम्ही बैठकीला का आलात?, विचारल्यामुळे वादाचा मुद्दा उफाळून आला. शेवटी मारामारी झाल्याची घटना घडली. बैठकीनंतर प्रतिक्रिया देताना पदाधिकारी म्हणाले की, आम्ही मनोज जरांगे यांच्यापाठीमागे खंबीरपणे उभे आहोत. परंतु काहींनी विनाकारण आपल्या लोकांची नावं पुढे करण्याचा प्रयत्न केला.

उमेदवार ठरवण्यावरुन झालेल्या वादामुळे मनोज जरांगे काय निर्णय घेतात, हे पाहाणं महत्त्वाचं आहे. मराठा समाजाच्या वतीने दिलेला उमेदवार हा केवळ मराठा असणार नाही तर तो दलित, मुस्लिम, धनगर समाजातील असणार आहे. त्याच्या पाठीमागे सर्वांनी खंबीरपणे उभं राहण्याचं आवाहन जरांगेंनी केलं होतं. परंतु आता मराठा समाजामध्येच तू-तू..मैं-मैं झाल्याने पुढे काय होणार, असा प्रश्न उपस्थित होतोय.

नेमकं काय घडलं?

मराठा समाजातर्फे निवडणुकी संदर्भात उमेदवारी ठरवण्यासाठी शुक्रवारी (ता.२९) हडकोतील मराठा मंदिर या ठिकाणी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत इच्छुकांनी उमेदवार नावे जाहीर करावी व सजेशन मांडावे असे सांगण्यात आले होते. याचवेळी खाली बसलेल्या विकी राजे नावाचा तरुण काहीतरी बोलला. म्हणून त्याला बैठकीत उपस्थित असलेल्यांनी मारहाण केली. यामुळे बैठकीत मोठा गोंधळ निर्माण झाला.

सदरील बैठकीतचा निरोप सर्वांना मिळालेला नव्हता मात्र काही फोनवर लोकांना बोलवण्यात आले, त्यानंतर ही बैठक सुरू झाली. यात सर्वांना निरोप का देण्यात आला नाही असा जाबही काही जणांनी विचारला. त्याचवेळी एका उमेदवारातर्फे एका महिला उमेदवाराच्या नावाची घोषणा केल्यानंतर सर्वांनी त्याला विरोध दर्शवला.

यावेळी काही उमेदवारांनी मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांचे नाव सुचवले. त्याचवेळी काही जणांनी बैठकीत चंद्रकांत खैरे यांची सुपारी घेऊन आले असल्याचा आरोप केला. नेमका तेव्हापासूनच गोंधळ सुरू झाला. सुपारी घेणाऱ्यांची नावे जाहीर करा, असे यावेळी सांगण्यात आले. त्यानंतर काही तरुण थेट विकी राजे या तरुणाकडे जात त्याला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली.

दरम्यान विकी राजे यांनी प्रस्थापित लोकांनाच उमेदवारी व त्यांचीच नावे समोर येत असल्याचा आरोप करत त्यांच्या लोकांनी मला मारहाण केले असल्याचे सांगितले. काहीच बोललो नसल्याचेही विकी राजे यांनी सांगितले. दरम्यान, विकी राजे यांनी खाली बसून शिवीगाळ केली असल्याचा आरोप काही समन्वयकांनी केला, त्यामुळे मारहाण झाली असल्याचे सांगण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नगराध्यक्षांची निवड जनतेतूनच! दिवाळीतच वाजणार निवडणुकांचा बिगुल; पहिल्या टप्प्यात नगरपालिका किंवा झेडपी, पंचायत समित्यांची निवडणूक

Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात बनवा हेल्दी एग रोल, पाहा रेसिपीचा Video

आजचे राशिभविष्य - 03 ऑक्टोबर 2025

अग्रलेख : अस्वस्थ स्वातंत्र्ययोद्धा

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 03 ऑक्टोबर 2025

SCROLL FOR NEXT