Manoj Jarange  Esakal
महाराष्ट्र बातम्या

Maratha Mumbai Morcha: मुंबईतल्या मोर्चासाठी कुठल्या मार्गानं यावं? सोबत काय घ्याव?; जरांगेंनी दिल्या स्पष्ट सूचना

आपण घरी रहायचं नाही. जर आपण घरी राहिलो तर आपल्या मुलांचं वाटोळ होईल, असं भावनिक आवाहन यावेळी जरांगे यांनी केलं आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : मराठा आरक्षणासाठी आता थेट मुंबईत धडक देण्याचा कार्यक्रम आंदोलक मनोज जरांगे यांच्याकडून आखण्यात आला आहे. त्यानुसार, २० जानेवारीपासून मुंबईतील आझाद मैदानात आरक्षणासाठी जरांगेंच्या उपोषणाला सुरुवात होणार आहे. यासाठी राज्यभरातील मराठा सामाजानं मुंबईत यावं, असं आवाहन जरांगेंनी केलं आहे.

यासाठी मोर्चाचा मार्ग कुठला असेल? आंदोलकांनी सोबत काय घेऊन यायचं? याच्या सूचना जरांगेंनी गुरुवारी मराठा समाजाला दिल्या. आपण घरी रहायचं नाही. जर आपण घरी राहिलो तर आपल्या मुलांचं वाटोळ होईल, असं भावनिक आवाहन यावेळी जरांगे यांनी केलं आहे. (Maratha Mumbai Morcha Manoj Jarange gave clear instructions to the community)

असा असेल आंतरवाली ते मुंबई मोर्चाचा मार्ग

आंतरवाली ते मुंबई हा पायी मोर्चाचा मार्ग कसा असेल? याची माहिती मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषदेत दिली. २० जानेवारी २०२४ रोजी आंतरवालीतून (जालना) सकाळी ९ वाजता मुंबईकडं प्रस्थान. शहागड मार्गे-गेवराई (बीड)-पाडळशिंगी-मादळमोई-तांदळा मातुरी मार्गे खरवंडी (नगर जिल्हा)-पाथर्डी-तिसगाव -करंजी घाट-अहमदनगर-केडगाव-सुपा-शिरुर (पुणे) -शिक्रापूर-रांजणगाव-वाघोली-खराडीबायपास-चंदननगर-शिवाजीनगर-पुणे-मुंबईहायवे-लोणावळा-पनवेल (नवी मुंबई) -वाशी-चेंबूर-आझाद मैदान(मुंबई)-दादर-शिवाजीपार्क (मुंबई) (Latest Marathi News)

पायी मोर्चा सहभागी होणाऱ्यांनी सोबत काय आणावं?

त्याचबरोबर मराठा आरक्षणासाठी जाणाऱ्या मोर्चात सहभागी होणाऱ्या मराठा समाजानं सोबत काय वस्तू आणाव्यात याची सविस्तर माहिती देखील जरांगे यांनी पत्रकार परिषदेत दिली. ट्रॅक्टर घेऊन मोर्चात सहभागी व्हावं.

यामध्ये पाण्याचे ड्रम कसे घ्यायचे, वस्तू कशा ठेवायच्या, सोबत जेवणासाठी काय घ्यायचं याचं सविस्तर पत्रक काढून माहिती देण्यात येणार आह. मुंबईतल्या लोकांची पाण्यासाठी गरज लागणार आहे, त्यांनी मदत करायची आहे. (Marathi Tajya Batmya)

आचारसंहिता काय असेल?

कोणीही फोटो काढण्यासाठी गर्दी करायची नाही. ज्या तुकडीत आपल्याला नेमून दिलं आहे त्यातच आपण चालायचं आहे. कोणीही गट तट ठेऊ नका. आझाद मैदान आणि शिवाजी पार्कची पाहणी करण्यासाठी उद्या एक टीम मुंबईला जाणार आहे. मोर्चाच्या मार्गात जी गावं येणार आहेत त्या गावातील लोकांनी मोर्चेकरांना चालण्यासाठी मदत करायची आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court : सुप्रीम कोर्टाचा भटक्या कुत्र्यांबाबत मोठा निर्णय ! शेल्टर होममध्ये ठेवता येणार नाही, नसबंदी हाच योग्य उपाय

AUS vs SA 2nd ODI: १९८७ नंतर वन डेत चमत्कार! भारताच्या दिग्गजानंतर 'हा' पराक्रम करणारा मॅथ्यू ब्रित्झके दुसराच फलंदाज ठरला

"आई अचानक आम्हाला सोडून गेली आणि.." ज्योती चांदेकरांच्या लेकीची आईच्या आठवणीत भावूक पोस्ट

Maharashtra Latest News Live Update : नागपुरात उद्या तान्हा पोळ्याच्या पार्श्वभूमीवर भोसलेकालीन काळी-पिवळी मारबत मिरवणूक निघणार..

Raisin Trader Fraud : पन्नास लाख रुपयांऐवजी कोऱ्या कागदांचे दिले बंडल, बेदाणा व्यापाऱ्याकडून दिल्लीतून साथीदारांनी उचलली रक्कम

SCROLL FOR NEXT