Bacchu Kadu 
महाराष्ट्र बातम्या

Maratha Reservation : सर्व मराठा हे कुणबीच, एक शासननिर्णय काढायला काय हरकत; बच्चू कडू यांचं विधान

रवींद्र देशमुख

मुंबई - जालना जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या उपोषणाला आता आठवडा होत आहे आहे. त्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण तापलं आहे. मराठा समाज कुणबी असून कुणबी असण्याच्या आधारे मराठा समाजाला ओबीसीमध्ये समावून घेण्याची मागणी करण्यात येत आहे. यावर बच्चू कडू यांनी भाष्य केलं.

बच्चू कडू म्हणाले की, मराठे हे कुणबी आहेत हे सूर्यप्रकाशा एवढे सत्य आहे. त्यामुळे एक शासननिर्णय काढायला काहीही हरकत नाही. मराठा समाज कुणबीमध्ये घ्यावा, त्याचा अभ्यास करणं, रिपोर्ट घेऊन वेगळा कायदा करण्यापेक्षा मराठा समाजाला कुणबी म्हणून ओबीसीत सामील केलं तर प्रश्न सुटेल. मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण द्यावं, अस मला वाटतं, असही बच्चू कडू यांनी नमूद केलं.

आंदोलकांवर लाठीमार करण्यावर बच्चू कडू म्हणाले की, मला कित्येकदा रात्री उचललं. उपोषण मोडून काढण्याचं अधिकाऱ्याचं स्कील असतं. लाठीमार करा, असं कोणीही म्हणत नाही. पण जबाबदारी तर सरकारचीच असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्याबाबत बच्चू कडू म्हणाले की, मी आधीच सांगितलं होत की, तीन विरोधीपक्षनेते सत्तेत गेले आहे. विजयभाऊची काय गॅरंटी आहे, असा टोला बच्चू कडू यांनी लगावला. मागील ५ वर्षातील झालेल्या पक्षांतराप्रमाणे पक्षांतर आतापर्यंत कधीच झालं नसल्याची आठवण त्यांनी करून दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jantar Mantar Protest: 'जंतर-मंतर'चा इतिहास काय? आंदोलनाचं ठिकाण कधीपासून बनलं, त्यापूर्वी काय व्हायचं; आता तीन पर्याय कोणते?

Shivsena UBT Leader Resign: ठाकरे गटाला मोठा धक्का! बड्या नेत्यानं तडकाफडकी दिला राजीनामा

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींसह INDIA आघाडीचे ८ नेते सुप्रीम कोर्टाच्या दिशेने रवाना; याचिका दाखल करणार

सर, मला अन् मित्राला वडा पाव हवाय; शाळकरी मुलाची विनंती, तुकाराम मुंढे काय म्हणाले ऐका... Video Viral

Yashasvi Jaiswal ला यष्टिरक्षण का करावसं वाटतंय? हे भलतंय खूळ डोक्यात येण्याचं कारण, घ्या जाणून...

SCROLL FOR NEXT