Manoj Jarange esakal
महाराष्ट्र बातम्या

Manoj Jarange : ''जास्तीचा वेळ मिळणार नाही, सापडलेल्या नोंदींच्या आधारावर सरसकट आरक्षण द्या'', जरांगेंचा आंतरवालीत निर्णय

मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्यातील मराठा समाजातील धुरिणांची एक बैठक आंतरवाली सराटी इथं बोलावली आहे.

संतोष कानडे

आंतरवाली सराटीः मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्यातील मराठा समाजातील धुरिणांची एक बैठक आंतरवाली सराटी इथं बोलावली आहे. या बैठकीमध्ये त्यांनी सरकारला जास्तीचा वेळ देणार नसल्याची भूमिका व्यक्त केली आहे. शिवाय सापडलेल्या ५४ लाख नोंदींच्या आधारावर राज्यातील मराठ्यांना सरसकट आरक्षण द्या, अशी मागणी जरांगेंनी केली.

बैठकीत बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, आपलं आरक्षण ओबीसीकडे आहे, त्यांच्याकडून आपल्याला घ्यायचं आहे. त्यामुळे त्यांच्यावर अन्याय होत आहे. त्यांचं आपल्याला एक इंचही नकोय. परंतु आपलं ते का खात आहेत? हा प्रश्न आहे.

''आता आपल्याला गुलालच घ्यायचा आहे, यात माघार नाही. धनगर आणि वंजारा समाजाला स्वतंत्र आरक्षण असल्याने यामध्ये त्यांचा काहीच प्रश्न नाहीये. मिळालेल्या कुणबी नोंदींच्या आधारावर अहवाल बनवून आरक्षण देण्याचा सरकारचा शब्द आहे. राज्याच्या सगळ्यात मोठ्या कायदेतज्ज्ञांनी आम्हाला लिहून दिलं आहे आणि सरकारने ते मान्य केलं आहे. त्यांच्याच शब्दावर सरकारने आरक्षण देण्याची गरज आहे.''

जरांगे पाटील पुढे म्हणाले की, जे कागदावर ठरलं आहे, त्या आधारावर मराठा समाजाला सरसकट आरक्षण द्या. कारण हे शब्द तुमचे आणि तुमच्या तज्ज्ञांचे आहेत. सरकार आरक्षण देईल, यात मराठ्यांना शंका नाही. परंतु आपल्याला सावध रहायचं आहे, त्यामुळे आजची बैठक बोलावली आहे.

''या बैठकीच्या निमित्ताने सरकारला विनंती आहे की, २४ डिसेंबरपर्यंत मराठा समाजाला आरक्षण द्यावं, जास्तीचा वेळ मिळणार नाही. आतापर्यंत मराठ्यांचा ५४ लाख नोंदी सापडलेल्या आहेत. त्यांना तात्काळ प्रमाणपत्र द्या, अनेकांचं प्रमाणपत्र थांबल्याची माहिती आहे. नोंदी सापडलेल्यांच्या घरी तलाठ्यांना पाठवून त्यांना प्रमाणपत्र द्या'', अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Malegaon Municipal Election : "जे काकांचे झाले नाहीत, ते आसिफ शेखचे काय होणार?" ओवैसींचा अजित पवारांवर बोचरा प्रहार

Snack Tourism 2026: खवय्यांसाठी नवा ट्रेंड! 2026 मध्ये स्नॅक टुरिझमचा नवा फंडा होणार हिट, नेमका काय विषय...

Latest Marathi News Live Update : पुण्यात मतदारांना आमिष दाखवल्याप्रकरणी गुन्हा दाखल

BMC Election: महापालिकेच्या रिंगणात गुन्हेगार उमेदवार! २५ गुन्हे नावावर असलेल्या गुंडास राष्ट्रवादीची उमेदवारी

Pregnancy Job Scam : महिलांना गरोदर करा आणि कमवा 10 लाख! 'प्रेग्नंट जॉब सर्विस'च्या नावाखाली मोठा घोटाळा उघड; नेमकं काय प्रकरण?

SCROLL FOR NEXT