Manoj Jarange  esakal
महाराष्ट्र बातम्या

Manoj Jarange : बंद दाराआड चर्चा? 'त्या' प्रश्नावर जरांगे पाटील भडकले, म्हणाले...

''व्यासपीठावर यायला ते (अधिकारी) भीतात.. लोकांमध्ये नको म्हणतात. त्यांचे प्रॉब्लेम आहेत आणि मलाही मार्ग काढायचा आहे. चर्चा काहीही झालेली नाही..'' असं स्पष्टीकरण जरांगे पाटलांनी दिलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

नवी मुंबईः मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांची अधिकाऱ्यांसोबतची चर्चा निष्फळ ठरल्याने मोर्चाने मुंबईकडे कूच केली आहे. विशेष म्हणजे आझाद मैदानामध्ये बसण्यासाठी पोलिसांनी परवानगी नाकारल्याची माहिती येत आहे. मात्र जरांगे पाटील आझाद मैदानावर ठाम आहेत. त्यामुळे सरकार नेमकं यात काय भूमिका घेतं, हे पाहाणं महत्त्वाचं आहे.

मनोज जरांगे पाटील यांना लोणावळ्यामध्ये भेटण्यासाठी विभागीय आयुक्तांचं एक शिष्टमंडळ आलेलं होतं. त्यापूर्वी जरांगे पाटलांनी सभेतील भाषणात लोकांना सांगितलं की, मी जेवण करुन घेतो आणि अधिकाऱ्यांशी चर्चा करतो. तोपर्यंत तुम्ही जेवण करुन घ्या आणि मुंबईच्या दिशेने गाड्या लावून ठेवा. त्यानंतर जरांगे पाटलांनी अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली.

शिष्टमंडळासोबतच्या चर्चेनंतर मनोज जरांगे यांनी एक पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये एका माध्यम प्रतिनिधीने विचारलेल्या प्रश्नावर जरांगे पाटील जाम भडकले.

''यावेळी आपली भूमिका वेगळी दिसतेय.. आतापर्यंत आपण व्यासपीठावर चर्चा केली, आता बंद दाराआड का चर्चा केली?'' असा प्रश्न एकाने त्यांना विचारला. त्यावर जरांगे पाटलांनी संतप्त होत उत्तर दिलं.

जरांगे पाटलांचं उत्तर त्यांच्यात भाषेत...

  • ''मी जेवण केलं नव्हतं.. बंद दाराआड चर्चा केलेली नाही. विनाकारण चुकीच्या वार्ता पसरवू नका. माझ्या समाजाला सगळं माहितंय... माझ्या समाजाला काही प्रॉब्लेम नाही. ते शिष्टमंडळ नव्हतं ते एक अधिकारी होते.. ते फक्त माहिती द्यायला आले होते.''

  • जरांगे पाटील पुढे म्हणाले, ''तुम्ही पहिल्या दिवसापासून विरोधातच बोलत आहात.. तुमचे प्रश्नच तेच आहेत.. तीच खदखद आहे. तुम्ही (मीडिया) जनतेचे आधारस्तंभ आहात.. आतापर्यंत मीडियाच्या बांधवांनी साथ दिली आहे. मी जेवण केलं नव्हतं.. वेळ वाचावा म्हणून जेवता जेवता चर्चा केली.''

  • ''व्यासपीठावर यायला ते (अधिकारी) भीतात.. लोकांमध्ये नको म्हणतात. त्यांचे प्रॉब्लेम आहेत आणि मलाही मार्ग काढायचा आहे. चर्चा काहीही झालेली नाही.. ५४ लाखांच्या नोंदीबाबत बोलणं झालं, सगेसोयऱ्यांबाबत चर्चा झाली, राज्यातल्या गुन्ह्याबद्दल चर्चा झाली आहे.

  • ते म्हणतात (अधिकारी) घोषणा दिल्या की, अंग थरथर कापतं.. त्यामुळे लोकांमध्ये बोलायचं नको म्हणाले. मी बंद दाराआडचा नाहीये. ते लोकांमध्ये यायला (अधिकारी) भीत आहेत..'' असं स्पष्टीकरण जरांगे पाटलांनी दिलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT