महाराष्ट्र बातम्या

Maratha Reservation: जरांगेंचं शिष्टमंडळ- CM बैठक संपली; चर्चेनंतर शिंदेंचं सूचक विधान

Manoj Jarange Delegation आंदोलकांच्या शिष्टमंडळासमवेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक पार पडली.

सकाळ डिजिटल टीम

मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र मिळावे यासाठी मनोज जरांगे जालन्यात उपोषणाला बसले आहेत

Manoj Jarange Delegation Meeting With CM Eknath Shinde

मुंबई : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जालना येथे आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. रात्री एक वाजेपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिष्टमंडळ यांच्यात बैठक सुरू होती. तब्बल अडीच तास चाललेल्या या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, याचा तपशील अद्याप समजू शकलेला नाही.

मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र मिळावे यासाठी मनोज जरांगे जालन्यात उपोषणाला बसले आहेत. शुक्रवारी जरांगे यांच्यावतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करण्यासाठी शिष्टमंडळ मुंबईत पोहोचले. आंदोलकांच्या शिष्टमंडळासमवेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक पार पडली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आमदार भरत गोगावले, माजी आमदार अर्जुन खोतकर, आण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, महाधिवक्ता डॉ. बिरेंद्र सराफ,  मुख्य सचिव मनोज सौनिक हे या बैठकीत उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी बैठकीनंतर ट्विट केले आहे. ‘मराठा समाजासाठी केलेल्या उपाययोजनांची तपशीलवार माहिती यावेळी देण्यात आली आणि पुढील कार्यवाहीसंदर्भात सुद्धा सविस्तर चर्चा झाली’, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आंदोलकांच्या शिष्टमंडळाशी सकारात्मक चर्चा झाली असून शनिवारी शिष्टमंडळ मनोज जरांगे यांना समजावेल. तर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ‘मागण्यांबाबत राज्य सरकार सकारात्मक आहे’, असे दानवेंनी सांगितले.

शिष्टमंडळात कोण होते?

या शिष्टमंडळात मनोज जरांगे पाटील यांच्यावतीने किरण सुभाष तारख, पांडुरंग वसंतराव तारख, श्रीराम कुरणकर हे उपस्थित होते. याशिवाय माजी मंत्री अर्जुन खोतकर, माजी कुलगुरू व तज्ज्ञ सर्जेराव निमसे हे देखील शिष्टमंडळासोबत मुंबईत आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ED Action against Anil Ambani : अनिल अंबानींवर ‘ED’ची मोठी कारवाई!, मुंबईतील अलीशान घर तात्पुरते जप्त

PCMC News : ‘स्थायी’च्या अध्यक्षपदासाठी अभिषेक बारणेंना संधी; एकमेव अर्ज दाखल; बिनविरोध निवड निश्चित, शनिवारी होणार शिक्कामोर्तब

Lung cancer in Mumbai : मुंबईत फुफ्फुसांच्या कर्करोगाच्या ५७ टक्के रुग्णांमध्ये प्रदूषण हेच प्रमुख कारण!

SL vs NZ, T20 WC: न्यूझीलंडची उपांत्य फेरीच्या दिशेने वाटचाल! श्रीलंकेचे आव्हान संपुष्टात, जाता जाता पाकिस्तानची लावली वाट

Bride shot at wedding ceremony Video : विवाहमंडपात थरार! नववधूवर माथेफिरू प्रियकरानं सर्वांसमोरच झाडली गोळी

SCROLL FOR NEXT