महाराष्ट्र बातम्या

Manoj Jarange : सरकारकडून मनोज जरांगेंना संपर्क साधण्याचा प्रयत्न; गिरीश महाजनांनी...

संतोष कानडे

जालनाः मराठा आरक्षणाच्या पूर्ततेसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेला वेळ मंगळवारी संपत आहे. त्यामुळे बुधवारी सकाळी ११ वाजल्यापासून जरांगेंचं उपोषण सुरु होणार आहे. त्यापूर्वी सरकारकडून आपल्याला संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरु झाल्याचं जरांगेंनी सांगितलं.

मनोज जरांगे पाटील आज (मंगळवारी) चौंडी येथे अहिल्यादेवींच्या दर्शनासाठी जात आहेत. त्यापूर्वी त्यांनी 'एबीपी माझा'शी संवाद साधला. आपण आरक्षणाच्या मागणीवर ठाम असून सरकारकडे फक्त आजचा दिवस आहे. उद्या सकाळी ११ वाजल्यापासून अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण आणि गावागावात साखळी उपोषण सुरु होईल, असं जरांगेंनी सांगितलं.

सरकारसोबत काही बोलणी झाली का? असा प्रश्न जरांगेंना विचारण्यात आला. त्यावेळी ते म्हणाले की, मागील एक ते दीड महिन्यापासून माझ्याकडे मोबाईल नाही. सोमवारी रात्री मंत्री गिरीश महाजन यांचा फोन आला होता, परंतु आमचं बोलणं झालेलं नाही. मी रात्री ३ वाजेपर्यंत कार्यक्रमांमध्ये व्यस्त होते. मुळात आता त्यांच्याशी बोलणी करायची नसून आरक्षण देणार असतील तरच चर्चा होईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, मनोज जरांगे यांनी सरकारला दिलेला वेळ संपत आल्याने सरकार काय पावलं उचलतं, हे बघावं लागेल. जरांगे यांनी राज्यभरातील मराठा बांधवांना साखळी उपोषण करण्याचं आवाहन केलं आहे. शिवाय अंतरवाली सराटीमध्ये राजकारण्यांना पाऊल न ठेवू देण्याचा निर्णय त्यांनी घेतला.

दुसरीकडे राज्य सरकार मात्र ईडब्ल्यूएस आरक्षणामधून मराठा समाजाने किती लाभ घेतला, याची आकडेवारी सांगत आहे. मराठा समाजासाठी असलेल्या सारथी आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ; या संस्थांनी आजवर मराठ्यांना काय फायदा झाला, याचीही आकडेमोड सुरु आहे. मात्र जरांगे पाटील महाराष्ट्रातील मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणीवर ठाम आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

September 1 Rule Changes 2026 : सप्टेंबर १ तारखेपासून बदलणार ५ महत्त्वाचे नियम; सामान्यांच्या खिशावर परिणाम, LPG सिलिंडरपासून कारच्या किमतीपर्यंत मोठे बदल

Gram Panchayat Delimitation: प्रभागरचनेचे काम, तलाठ्यांना घाम ; ग्रामपंचायतीकडेच सोपवा; संघटनेची महसूल विभागाकडे मागणी

Laxman Hake: ओबीसी आरक्षणासाठी मोठा एल्गार! लक्ष्मण हाकेंची मोठी घोषणा; मुंबईकडे कूच करण्याचा निर्धार

Marathi News Live Updates : सुशिक्षित पूर्वज असल्याने आदिवासी दावा नाकारता येणार नाही, उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

15000 Teacher Recruitment : TET ची अट रद्द! राज्यात 15 हजार शिक्षकांची मेगा भरती; 600 क्रीडा शिक्षकांसाठी स्वतंत्र पात्रता निकष जाहीर, ऑनलाईन मागविले अर्ज

SCROLL FOR NEXT