Maratha Reservation Esakal
महाराष्ट्र बातम्या

Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी सरकारला दिलेला अल्टिमेटम संपला, मनोज जरांगे आजपासून आमरण उपोषणाला बसणार

मराठा आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे

अंकिता खाणे (Ankita Khane)

मराठा आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. तर मनोज जरांगे यांनी सरकारला दिलेला वेळ संपला आहे त्यामुळे आंदोलनाचा विषय पुन्हा एकदा समोर आला आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या, अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे. दरम्यान, राज्य सरकारला दिलेलं 40 दिवसांचं अल्टिमेटम आज संपलं आहे. त्यामुळे मनोज जरांगे यांनी जाहीर केल्याप्रमाणे ते आजपासून आमरण उपोषणाला बसणार आहेत.

त्याचबरोबर, प्रत्येक जिल्हा पातळीवर साखळी उपोषण करण्यात येणार आहे. त्याचबरोबर राजकीय नेत्यांना पुढाऱ्यांनांही गावबंदी करण्यात येणार आहे. दरम्यान आज सकाळी 11 वाजता मनोज जरांगे पाटील पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत मनोज जरांगे काय बोलणार पुढची भुमिका काय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान, राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी मनोज जरांगे यांच्याशी चर्चा केली आहे, त्यांनी मनोज जरांगे यांना सरकारला थोडा वेळ देण्याची विनंती केली आहे. मात्र, यावर मनोज जरांगे यांनी आता कोणालाही वेळ दिला जाणार नाही, त्यांनीच वेळ घेतलेला आहे. चाळीस दिवसाचा आणि समाजाने मुख्यमंत्र्यांच्या सन्मान ठेवला आहे एक महिन्यापेक्षा अधिक दिवस सरकारला दिले होते, वेळ त्यांनी स्वतः घेतलेला आहे, त्यामुळे आता वेळ मिळू शकत नाही, अशी स्पष्ट भूमिका जरांगे यांनी घेतली आहे.

आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. तर काही तरूणांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत. त्यांना मनोज जरांगे यांनी आत्महत्या न करण्याची विनंती करत सोबत लढण्याचं आवाहन केलं आहे.

'आत्महत्या करू नका आरक्षण कसे देत नाही ते आम्ही पाहू माझ्या खांद्याला खांदा लावून लढण्यासाठी तुम्ही उभे रहा माणसे कमी होता कामा नये. आता आमरण उपोषण सुरू केले जाणार असून त्यामध्ये उपचारही घेतले जाणार नाही. पाणी घेतले जाणार नाही, टोकाचं उपोषण केलं जाणार', असेही मनोज जारांगे पाटील यांनी सांगितलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Multibagger Stock: 5 दिवसांतच 1 लाखाचे झाले 3 लाख! 300% रिटर्न देणाऱ्या शेअरने गुंतवणूकदारांना केले मालामाल

आरक्षणावरून सुरू झाला वाद अन् कॉलेजमध्ये पेटलं वातावरण! कसा आहे ‘जयंती २’? वाचा Review

Hindi Medium Engineering: इंग्रजीची अडचण दूर! आता चक्क हिंदीतून सिव्हिल इंजिनिअरिंग; विद्यार्थ्यांना मिळणार रु. २ लाखांचे अनुदान

Latest Marathi News Live Update : राज्यात दुष्काळजन्य स्थिती, राज्यात ऑगस्ट महिन्यात ४६ टक्के तूट

Ganeshotsav 2026: हरतालिका अन् गणेश चतुर्थी एकाच दिवशी का? पूजा करण्याची योग्य वेळ कोणती? | Ganesh Chaturthi 2026

SCROLL FOR NEXT