Manoj Jarange esakal
महाराष्ट्र बातम्या

Manoj Jarange : 'पुन्हा जेलमध्ये जायचं नाही म्हणून भुजबळांचा कांगावा', मनोज जरांगे पाटील म्हणाले...

संतोष कानडे

छत्रपती संभाजी नगरः मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा समाजाच्या सरसकट आरक्षणाला विरोध कायम ठेवला आहे. बुधवारी सभागृहात बोलताना भुजबळांनी जीवाला धोका असल्याचं म्हटलं होतं.

''माझं पोलिस संरक्षण अचानक वाढवलं, मी विचारलं तर म्हणाले तुम्हाला धोका आहे. माझ्यावर बंदुकीची गोळी चालू शकते'' असं विधान भुजबळांनी सभागृहात केलं होतं. शिवाय आजवर मराठा मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही, त्याचं कारण त्यांची सद्सद्विवेक बुद्धी जागरुक होती, असं वादग्रस्त विधानही त्यांनी केलं.

भुजबळांच्या आरोपांना उत्तर देताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, स्वतःला संरक्षण मिळावं म्हणून भुजबळ काहीही बोलत आहेत, रडून सरकारला फसवत आहेत.. त्यांना त्यांच्यावरचे आरोप क्लिअर करुन घ्यायचे आहेत. पुन्हा जेलमध्ये जायचे नाही म्हणून हे सगळं सुरु असल्याचा आरोप मनोज जरांगेंनी केला आहे.

काय म्हणाले मनोज जरांगे?

मराठा आरक्षण मिळालं नाही पाहिजे, अशी भूमिका भुजबळांनी घेतली आहे. ओबीसी महामंडळ तुम्ही खाल्लं, पाय तोडण्याची भाषा तुम्हीच करायची, तुम्हाला कोण कशाला गोळी मारेल? तुम्हाला मारण्यावाचून कुणाचं अडलेलं नाही.. सरकार मराठ्यांना आरक्षण देण्याऐवजी भुजबळांवरच्या केसेस मागे घेत आहे.

''मागासवर्ग आयोगातील माजी सदस्यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला नव्हता पाहिजे. संविधानाच्या पदावर बसलेल्या अध्यक्षाने जातीचा विचार करायचा नसतो. मराठ्यांच्या नोंदी सापडलेल्या आहेत, त्यामुळे त्यांनी आरक्षण दिलं असतं तरी काही अडचण नव्हती. मराठ्यांना द्यायचं म्हटलं की अनेकांचं पोट दुखतं.''

जरांगे पुढे म्हणाले, भुजबळांचे ऐकून सरकारने आणि देवेंद्र फडणवीस यांनी निर्णय घेऊ नये, नाहीतर मराठा मोठं आंदोलन उभं करणार आहे. भुजबळ बोलले की त्यांना हवं ते दिलं जातं.. आमचं त्याबद्दल काहीही म्हणणं नाहीये. परंतु आमच्या हक्काचं आरक्षण आम्हाला मिळालं पाहिजे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bharat Taxi Cab Service : ‘ओला-उबर’ला मिळणार जबरदस्त टक्कर!, देशभरात आजपासून ‘भारत टॅक्सी’ कॅब सेवा सुरू

New York: न्यूयॉर्क शहराला मिळाला पहिला मुस्लिम महापौर; कुराण हातात घेऊन घेतली शपथ

KYV Process: वाहनधारकांना मोठा दिलासा! FASTag नियमात महत्त्वाचा बदल; डिजिटल टोल व्यवस्थेत सुधारणा

Video Viral: आईsss शप्पथ... हा तर स्विंगचा किंग! याच्या गोलंदाजीचा सामना करताना भल्याभल्यांना फुटेल घाम...

'बिग बॉस मराठी ६' मध्ये होणार 'या' अभिनेत्रीची एंट्री; रितेश देशमुखसोबत केलंय काम; कोण आहे ती?

SCROLL FOR NEXT