Maratha Reservation Esakal
महाराष्ट्र बातम्या

Maratha Reservation: मराठा आंदोलनाला पुन्हा एकदा हिंसक वळण; बीड-कल्याण एसटी बसवर दगडफेक

बीडमध्ये पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला हिंसक वळण लागला आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

बीडमध्ये पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला हिंसक वळण लागला आहे. रात्रीच बीड कोल्हापूर बस पेटवून दिले असताना आज पुन्हा एकदा बीड कल्याण बसवर तुफान दगडफेक करत एसटी बस फोडण्यात आली आहे. बीडच्या सराटा गाव परिसरात ही घटना घडली असून मराठा आंदोलक बस फोडून घटनास्थळावरून निघून गेले. दरम्यान मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला पुन्हा एकदा हिंसक वळण लागल्याने प्रशासनाची मात्र धावपळ होताना पाहायला मिळत आहे .

बीडमध्ये मध्यरात्री बायपास रोडला टायर जाळून निषेध करण्यात आला. तर बीडच्या धुळे सोलापूर रोडवर एक बस जाळण्यात आली. आज सकाळी पुन्हा एकदा बीड पासून काही अंतरावर असलेला चराटा फाटा या ठिकाणी कल्याण गाडीची तोडफोड करण्यात आली आहे.

उमरखेडमध्ये अज्ञातांनी बसला लावली आग

नांदेडहून नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या अज्ञात व्यक्तींनी बसला आग लावली. शुक्रवारी रात्री ११.३० च्या सुमारास ही घटना घडली. या आगीत बस जळून पूर्णत: खाक झाली.

या घटनेनंतर रात्री बस बंद करण्यात आल्या होत्या. मात्र, पुन्हा एकदा सकाळी बस चालू झाल्या. आंदोलकांनी बीडच्या सराटा फाटा रोडला कल्याण गाडीवर दगडफेक करत या गाडीचं नुकसान केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jammu Kashmir : पूंछमध्ये LoC जवळ मोठा स्फोट; लष्कर-ए-तोयबाचा कमांडर मोहम्मद फैजानसह चौघांचा मृत्यू

IND A vs NZ A: न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारताच्या संघात मोठा बदल; रिषभ पंत बाहेर, तर २१ वर्षांचा खेळाडू घेणार जागा

Latest Marathi News Live Update : पुण्यात पाण्याचं संकट! गुरुवारपासून १० टक्के कपात, आठवड्यातून एक दिवस पाणी बंद

Success Story: २ खोल्यांचे घर, ४ भावंडांचे यूपीएससीत यश! कुणी आयएएस तर कुणी आयपीएस बनले

Akola News : नवरात्रीत अकोला पोलिसांकडून नागरिकांना दिलासा! २ कोटी २८ लाखांचा मुद्देमाल परत; ५२६ मोबाईल, ५० वाहने, सोन्याचे दागिने आणि रोख रकमेचा समावेश

SCROLL FOR NEXT