Maratha Reservation 
महाराष्ट्र बातम्या

Maratha Reservation: जरांगे मुंबईच्या दिशेने निघाले पण अद्याप मुंबई पोलिसांची परवानगी नाही, काय आहेत पर्याय?

मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या दिशेने निघालेल्या जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला अद्याप मुंबई पोलिसांकडून परवानगी मिळाली नाही. मराठवाड्यासह इतर जिल्ह्यातून मोठ्या संख्येने समाज बांधव महिनाभराचा रेशन व्यवस्था करून मुंबईच्या दिशेने निघाले आहेत.

Sandip Kapde

Maratha Reservation:

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथून मराठा समाज बांधव मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. मराठवाड्यासह इतर जिल्ह्यातून मोठ्या संख्येने समाज बांधव महिनाभराचा रेशन व्यवस्था करून मुंबईच्या दिशेने निघाले आहेत.

मात्र मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या दिशेने निघालेल्या जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला अद्याप मुंबई पोलिसांकडून परवानगी मिळाली नाही. आंदोलनासाठी जरांगे पाटील यांच्या शिष्ठमंडळाने वांद्रे, बीकेसी आणि आझाद मैदान येथे परवानगी मिळावी यासाठी अर्ज केला होता.

तीन मैदांनांपैकी आझाद मैदान ही जागा आंदोलनासाठी निश्चित करण्यात आली असून त्यासाठी पोलिस परवानगीही मागण्यात आली होती. मात्र अद्याप जरांगे पाटलांच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी दिलेली नाही.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मनोज जरांगे यांच्याशी चर्चा करणार असल्याची शक्यता आहे. मराठा आरक्षणासाठी सरकार सकारात्मक असताना टोकाचे पाऊल न उचलण्याचे आवाहन एकनाथ शिंदे मनोज जरांगे यांना करणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin September Installment : लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! सप्टेंबरचा हप्ता 'या' दिवशी खात्यात होणार जमा; 1 कोटी 66 लाख महिलांची प्रतीक्षा संपणार

Mumbai Local: तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक! प्रवाशांचे होणार हाल; वेळापत्रक पाहूनच बाहेर पडण्याचे आवाहन

New Kabaddi Rules Changes 2026 : कबड्डीचे नियम बदलले! आता बदली खेळाडू आणि लॉबीच्या नियमात मोठा बदल; जाणून घ्या कबड्डीचे नवीन 6 नियम

Latest Marathi News Live Update : उद्धव-राज ठाकरे मोर्चास्थळाकडे रवाना

IND vs WI: वेस्ट इंडिजच्या ऐतिहासिक विजयामागे धोनीचा हात? शाय होपने उघडलं राज; म्हणाला, ‘माहीने मला हेच सांगितलं होतं...’

SCROLL FOR NEXT