maratha reservation maratha reservation
महाराष्ट्र बातम्या

Maratha Reservation Protest: मराठा क्रांती मोर्चाकडून रविवारी महाराष्ट्र बंदची हाक? लाठीचार्जच्या निषेधात निर्णय

कार्तिक पुजारी

मुंबई- मराठा क्रांती मोर्चाकडून रविवारी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. जालना जिल्ह्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. जालना जिल्ह्यातील मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. मराठा आक्रोश मोर्चावर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. त्यामुळे राज्यातील वातावरण तापले असून त्याचे पडसाद सर्वत्र उमटताना दिसत आहेत.

मराठा क्रांती मोर्चाकडून महाराष्ट्र बंदची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाचं उपोषण सुरु होतं. यावेळी पोलिसांवर आंदोलकांनी गदडफेक केल्याचा आरोप आहे. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याचं सांगितलं जातंय. संघर्षामध्ये पोलिस आणि ग्रामस्थ जखमी झाले आहेत. या घटनेचा सर्व स्तरांतून निषेध व्यक्त केला जात आहे.

माहितीनुसार, जालन्यात जाळपोळ आणि दगडफेक प्रकरणी एकूण १६ ज्ञात तर ३०० ते ३५० अज्ञात लोकांवरतीही गुन्हे दाखल करण्यात आलेत. कलम ३०७ आणि ३३३ अंतर्गत सार्वजनिक मालमत्तेलचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्ह्यांची नोंद करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिलीये. तसेच इतर गावात पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे.

माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी जालन्यातील घटनेचा निषेध व्यक्त केला आहे. तसेच त्यांनी सरकार सुनावलंय. आंदोलकांवर गोळीबार कसा करता? ते पाकिस्तानी किंवा दहशतवादी आहेत का, असा सवाल त्यांनी सरकारला केला. यावेळी संभाजीराजेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली. तुम्ही पोलिसांच्या लाठीचार्जचे समर्थन कसे करु शकता, असं ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Subhash Chandra: सुभाष चंद्रा यांच्यावर सीबीआयकडून फसवणुकीचा गुन्हा; 'एलआयसी'च्या तक्रारीवरुन मोठी कारवाई

Pakistan Chief of Defence Forces : पाकिस्तानची नवी खेळी; लष्करी व्यवस्थेत ऐतिहासिक सत्ताबदल, असीम मुनीर बनले ‘चीफ ऑफ डिफेन्स'

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना बाप्पा पावणार! गणेशोत्सवात महिलांना मिळणार ३,०००? योजनेबाबत नवी अपडेट समोर

Marathi News Live Updates: केतन अग्रवाल हत्या प्रकरणात रितेश हांगे नावाच्या तरुणाला अटक

Google Android: गुगलने आणले ५ हाय-टेक फीचर्स! कारमध्ये फोन वापरताना चक्कर येणे बंद; 'मोशन असिस्ट' फीचर कसे करेल काम?

SCROLL FOR NEXT