Maratha Reservation Protest cdj98
महाराष्ट्र बातम्या

Maratha Reservation Protest : मराठा समाजाने काढलेले मूक मोर्चे तुम्हाला आठवत आहेत का ? काय आहे त्यांचा इतिहास ?

Maratha Reservation Protest : कोपर्डी गावात एका मुलीवर बलात्कार करून तिचा खून करण्यात आला

Chinmay Jagtap

Maratha Reservation Protest : यापुढे जेव्हा जेव्हा महाराष्ट्राचा सामाजिक किंवा राजकीय इतिहास लिहिला जाईल त्यावेळेस महाराष्ट्रात मराठा समाजाने काढलेल्या मूक मोर्चांची नोंद त्यात नक्कीच घेतली जाईल. याचे कारण म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणावर एकवटलेला एखादा समाज इतका शांतता प्रिय आंदोलन करू शकतो हे मराठा समाजाने जगाला दाखवून दिलं होतं.

मराठा क्रांती मोर्चा किंवा मराठा क्रांती मूक मोर्चा हे मराठा समाजाने २०१६-१७ साली काढलेले मोर्चे होते. 13 जुलै 2016 रोजी अहमदनगर जिल्ह्यामध्ये कोपर्डी या गावात एका मुलीवर बलात्कार करून तिचा खून करण्यात आला. हि घटना खूप क्रूर होती. त्यावेळी त्या मुलीच्या शरीराचे अक्षरशः लचके काही नराधमांनी तोडले होते. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाज एकवटला आणि सर्व जिल्ह्यांमध्ये त्या मुलीला न्याय मिळण्यासाठी न्याय मिळवून देण्यासाठी मोर्चे काढण्यात आले होते.

यावेळी मराठा बांधवांनी कोपर्डी प्रकरणातील आरोपींना मृत्युदंड देण्यात यावा. ॲट्रॉसिटी कायदा रद्द किंवा शिथिल करावा मराठा समाजाला शैक्षणिक व नोकरीत आरक्षण द्या अशा प्रमुख मागण्या केल्या होत्या.

संपूर्ण महाराष्ट्रात विविध ठिकाणी काढण्यात आलेले हे मोर्चे अतिशय शांतता प्रिय होते. या मोर्चांनी मराठा समाजाची एकजूट संपूर्ण जगाला दाखवून दिली. आणि आपल्या मागण्या शांततेच्या स्वरूपात कशा मांडायच्या हे देखील त्यांनी दाखवून दिलं. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षणाचा आश्वासन दिलं होतं आणि त्यांच्या मान्य मागण्या मान्य केल्या होत्या.

कुठे कुठे आणि किती तारखेला निघाले मूक मोर्चा

अहमदनगर मध्ये या मोर्चाला सुरुवात झाली. त्यानंतर 9 ऑगस्ट रोजी औरंगाबाद, 30 ऑगस्ट रोजी बीड, 18 सप्टेंबर रोजी अकोला, 21 सप्टेंबर रोजी नवी मुंबई, 23 सप्टेंबर रोजी अहमदनगर, 25 सप्टेंबर रोजी पुणे, 25 सप्टेंबर रोजी यवतमाळ, 25 सप्टेंबर रोजी वाशिम, 27 सप्टेंबर रोजी सांगली, 28 सप्टेंबर रोजी धुळे, 2 ऑक्टोबर रोजी हैदराबाद, 9 ऑक्टोबर रोजी ट्विट मोर्चा काढून ९ ऑक्टोबर रोजी बदलापूर 15 ऑक्टोबर रोजी कोल्हापूर, 16 ऑक्टोबर रोजी ठाणे चिपळूण आणि 19 ऑक्टोबर रोजी चंद्रपूर जिल्ह्यात मराठा समाजाने हा मूक मोर्चा काढला होता.

महत्वाच्या मागण्या

कोपर्डी बलात्कार प्रकरणी दोषींना कठोर शिक्षा व्हावी.

शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमधील मराठा समाजाला आरक्षण मिळावे.

अट्रोसिटी कायदा रद्द किव्वा शिथिल करावा.

डॉ. एम.एस. स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली शेतकऱ्यांवरील राष्ट्रीय आयोगाच्या शिफारशी लागू करावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : पुण्यात महात्मा गांधीजींच्या पुतळ्याचे शिर उडवण्याचा प्रयत्न; एकाला पोलिसांनी घेतले ताब्यात

Lottery Scam : लॉटरीच्या नावाखाली दाम्पत्याने 600 लोकांना 40 कोटींचा घातला गंडा; लोकांनी 5 ते 10 लाखांपर्यंत केली होती गुंतवणूक

Maharashtra Rain Update News : राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस, पुढील पाच दिवस महत्वाचे; ११ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी

IT Park:'जमीन पसंत पडेना, आयटी पार्क होईना'; प्रशासनाचा कागदी खेळ, कृषि महाविद्यालयला पर्यायी प्रस्ताव मान्य नाही

Indian Railways: मिनिटाला निघणार दीड लाख तिकिटे; रेल्वे प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय,आरक्षण केंद्रातील यंत्रणेत बदल

SCROLL FOR NEXT