Maratha Reservation Esakal
महाराष्ट्र बातम्या

Maratha Reservation: राज्यातील बड्या नेत्यांची दिल्लीत बैठक; मराठा आरक्षणावर होणार चर्चा?

राज्यात मराठा आरक्षणावरून आंदोलक आक्रमक झाले आहेत, यामुळे राज्यातील राजकारण देखील तापलं आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

राज्यात मराठा आरक्षणावरून आंदोलक आक्रमक झाले आहेत, यामुळे राज्यातील राजकारण देखील तापलं आहे. मराठा आंदोलनाच्या मागणीसाठी आंदोलकांनी आमदारांची घरे, गाड्या जाळल्या, रास्तारोको केले, राजकीय पक्षांची कार्यालय फोडली. रस्ते वाहतूक, महामार्ग रोखून धरले जात आहेत. काही भागात मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत. त्यामुळे एसटी सेवा देखील बंद ठेवण्यात आली आहे.

मराठा आरक्षणाच्या प्रकरणावर मुंबईत सह्याद्री अतिथीगृहावर सर्वपक्षीय बैठकीच आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत कोणताही ठोस निर्णय झाला नाही. मराठा समाजाला आरक्षण देण्यावर सर्वपक्षीय नेत्यांचे एकमत झाले. शांतता राखा आणि मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घ्यावं, असं नेत्यांनी म्हटलं आहे. आता महाराष्ट्रात घडामोंडीची दिल्लीत दखल घेतल्याच्या चर्चा आहेत. राजधानी दिल्लीत देखील घडामोडींना वेग आला आहे.

आज भाजपा नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहे. या भेटीवेळी मराठा आरक्षणाबाबतही या भेटीत चर्चा होणार असल्याची माहिती आहे.

आज दुपारी 3.30 वाजता ही महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. मराठा आरक्षणाबाबत सरकारच्या हालचाली वाढल्या आहे. दिल्लीत होणाऱ्या बैठकीकडे याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Live News : पंतप्रधान मोदींनी चेन्नईमध्ये विकासकामांची पायाभरणी केली

Solapur Temperature: ‘चित्रा’च्या पहिल्याच दिवशी पारा ३८ अंशांवर, नक्षत्र बदलले मात्र परिस्थिती बदलेना; रब्बीच्या पेरण्या खोळंबल्या, ६१ वर्षांचा विक्रम मोडणार?

Yuvraj Singh on Dhoni: ‘तो माझा जवळचा मित्र नव्हता…’ युवराज सिंगने सांगितली माहीसोबतच्या नात्याची Inside Story;माहीने करिअरच्या शेवटी...

सुरुची अडारकर-पियुष रानडे यांच्या घरी लक्ष्मीचं आगमन! सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाले, 'आमच्या टीममध्ये आता नवा मेंबर’

Someshwar Sugar Factory Election: सोमेश्वर कारखाना निवडणूक: पहिल्या दोन तासांत साडेबारा टक्के मतदान, सुनेत्रा पवारांचा विश्वास

SCROLL FOR NEXT