Maratha Reservation 
महाराष्ट्र बातम्या

Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी सरकार काढणार 'तीन' नवीन अधिसूचना, बच्चू कडूंची विस्तृत माहिती; मनोज जरांगेंना देणार मसुदा

विभागीय आयुक्तांच्या बैठकीनंतर बच्चू कडू यांनी आज पत्रकार परिषद घेतली. सरकारचे शिष्टमंडळ मनोज जरांगे यांची भेट घेणार आहेत. नवीन ड्राफ्ट मनोज जरांगे पाटील यांना देण्यात येणार आहे.

Sandip Kapde

Maratha Reservation

विभागीय आयुक्तांच्या बैठकीनंतर बच्चू कडू यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या बैठकीत मराठा आरक्षणावर चर्चा करण्यात आली. मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी आक्रमक झाले आहेत. २२ जानेवारीला मुंबईत आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर सरकारने गंभीर दखल घेतली आहे. दरम्यान सरकारचे शिष्टमंडळ मनोज जरांगे यांची भेट घेणार आहेत. नवीन ड्राफ्ट मनोज जरांगे पाटील यांना देण्यात येणार आहे.

बच्चू कडू म्हणाले, संपूर्ण महाराष्ट्रात ५४ लाख नोंदी सापडल्या आहेत. त्यापैकी ३० ते ३५ हजार नोंदी मराठवाड्यातील आहेत. सगेसोयरे यांना आरक्षण कस देता येईल यासंदर्भात एक मसूदा तयार करण्यात आला. या संदर्भात अधिसूचना काढणार आहोत. त्या देखील मनोज जरांगे यांनी दाखवण्यात येणार आहे.

काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ४ सचिव यांच्यासोबत ५ तास बैठक झाली. या बैठकीत एका-एका शब्दावर चर्चा करण्यात आली. एक मसुदा आता मनोज जरांगे यांनी दाखवणार आहोत. मसुदा जरांगेंना दाखवल्यानंतर त्यांची भूमिका लक्षात घेण्यात येईल. त्यांचे मत आम्ही जाणून घेऊ. प्रशासन जास्तीत जास्त दाखले देणार आहे. स्वयंपाक केला पण जेवण नाही, असं होऊ नये म्हणून सरकार याची काळजी  घेणार आहे. मी देखील त्याचा आढावा घेणार आहे. आता विभागीय बैठक झाली, आता जिल्हास्तरावर जाऊ, असे बच्चू कडू म्हणाले.

यावेळी बच्चू कडू यांनी एक उदाहरण सांगितलं. ते म्हणाले, एक नमुना आम्हाला भेटला यामध्ये राघोजीराव लिहलं आहे. या नमुन्यात गाव आलं पण आडनाव आलं नाही. आडनाव न आल्यामुळे शोधणं खूप कठीण जातं. तो एक प्रस्ताव आपण नव्याने तयार करत आहोत. आपण संपूर्ण वंशावळ काढणार आहोत. एक प्रस्ताव देऊन सरकारला देणार आहोत. यासाठी वेगळी टिम देखील तयार करण्यात येणार आहे. कोतवाल बूक आणि जन्म-मृत्यू नोंदी मराठवाड्यात सापडत नाहीत. काही गहाळ झाले किंवा ठेव ठेवली गेली नाही. विदर्भात ह्या नोंदी सहज सापडतात. जे कागदपत्र आहेत ते जिर्ण आहेत मात्र मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे हे मोठे यश आहे की आपण  एक कोटी ९४ लाख लाख कागदपत्रांची आपण तपासणी केली.

एका-एका जिल्ह्यात ३०-३० लाख कागदपत्रांची तपासणी करण्यात आली आहे. ३३,३४ चे नमुने पुरावा म्हणून पाहण्यासाठी आपण नियम तयार केला आहे. त्यामुळे जास्तीत जास्त दाखले देण्याचा आपण प्रयत्न करु. सगे सोयरे, जुणे पुरावे ३३, ३४ नमुना तसेच त्र्यंबकेश्वर, भटाकढे असलेली माहिती, लसीकरणाची माहिती पुरावा किंवा सहपुरावा म्हणून गृहीत धरण्याबाबत आपण ती अधिसूचना काढणार आहोत, अशी माहिती बच्चू कडू यांनी दिली.

प्रशासनात खूप मोठं काम झालं आहे. आडनाव, वंशज अशी खूप मोठी प्रोसेस आहे. मनोज जरांगे यांना आधी अधिसूचना देणार आहोत, त्यांना सर्व मुद्दे पटले तर अधिसूचना सार्वजनिक करु, अशी माहिती देखील बच्चू कडू यांनी दिली. ( Maratha Reservation Update)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rain News: पोलिसांच्या धाडसी कृतीचे कौतुक! शाळेची बस पाण्यात अडकली अन्...; विद्यार्थ्यांच्या थरारक सुटकेचा व्हिडिओ व्हायरल

Santosh Deshmukh Case: ''उपमुख्यमंत्र्यांना हात जोडून विनंती, यांना पदावर ठेऊ नका'', धनंजय देशमुखांची अजित पवारांना विनवणी

Indian Ports Bill: समुद्री व्यापाराला बूस्ट! भारताचं ‘मेगा पोर्ट’ महाराष्ट्रात उभं राहणार, तब्बल 'इतक्या' कोटींचा प्रकल्प

Network Services Down: कॉल नाही, इंटरनेट गायब...; Airtel, Jio, Vi सेवा ठप्प, मोबाईल नेटवर्क डाऊन!

Latest Marathi News Live Updates: १४ गावातील रेल्वेचा बोगद्यात साचले पाणी

SCROLL FOR NEXT