Maratha Reservation 
महाराष्ट्र बातम्या

Maratha Reservation: कुणबी दस्तावेज ऑनलाइन बघता येणार... सरकारकडून प्रक्रियेला सुरुवात!

Sandip Kapde

Maratha Reservation: राज्य सरकारकडे जमा झालेले कुणबी दस्तावेज ऑनलाइन बघता येणार आहेत. सर्व दस्तावेज ऑनलाइन उपलब्ध करण्यासाठी सरकारकडे प्रक्रियेला सुरुवात केली असून १९६७ पूर्वी असलेले जाती आणि वंशावळीचे पुरावे व दस्तावेज, अभिलेख ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत.

महसूल विभागाकडून जिल्हानिहाय वांशावळचे दाखले आणि त्या संबंधी कागदपत्र ऑनलाइन उपलब्ध केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. महसूल विभाग आणि स्थानिक जिल्ह्यांच्या संकेत स्थळांवर कागदपत्रे ऑनलाइन दिसणार असून मराठा समाजाला याचा मोठा लाभ होणार आहे. साम टिव्हीने याबाबत वृत्त दिले आहे. (Latest Marathi News)

ज्या मराठ्यांकडे निजामकालीन महसूल किंवा शिक्षणाची कागदपत्रे आहेत, त्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला होता. ज्यांच्याकडे पुरावे आहेत त्यांना  महाराष्ट्रातील इतर मागासवर्गीय (OBC) प्रवर्गातील गटात कुणबी म्हणून ओळखले जाते.

कुणबी जात प्रमाणपत्र देण्यासाठी एसओपी निश्चित करण्यासाठी स्थापन केलेल्या समितीला जागा देण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाने न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) समितीला बैठका घेण्यासाठी राज्य सचिवालय, मंत्रालयाच्या ८ व्या मजल्यावर जागा दिली आहे. सरकारने स्थापन केलेल्या समितीसाठी कर्मचाऱ्यांची नियुक्तीही केली आहे. यात २० सदस्यांचा समावेश आहे ज्यात अतिरिक्त सचिव दर्जाचा अधिकारी व अन्य अधिकारी यांचा समावेश आहे.

मराठवाड्यातील कुणबी नोंदी शोधण्याची मोहीम राज्यभर मिशन मोडमध्ये राबवण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. जुन्या नोंदी, वंशावळी, नागरिकांकडून उपलब्ध असलेले शैक्षणिक व महसुली पुरावे, संस्थांनी दिलेली सनद, राष्ट्रीय कागदपत्रे आदी तपासण्यासाठी विशेष कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
विशेष कक्षात मराठा-कुणबी संबंधित कागदपत्रे जमा करण्याचे आवाहनही प्रशासनाने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Goa Highway Update : गडकरी म्हणाले महिनाभर, पण वास्तव काही वेगळंच! मुंबई-गोवा महामार्गाची पाहा सविस्तर 'डेडलाईन'; पावसाळ्यापूर्वी रस्ता होणार का चकाचक?

Asha Bhosle’s Final Song : “या प्रवासाच्या शेवटी मी एक स्वर बनेन…” आशा ताईंंच शेवटचं गाणं चर्चेत, Viral Video

Jallianwala Bagh Massacre : रक्तरंजित इतिहासाला १०७ वर्षे पूर्ण; १६०० हून अधिक निष्पापांचा बळी घेणाऱ्या नरसंहाराची कहाणी

Pandharpur : तरुणीने स्वत:च अ‍ॅसिड ओतून घेतलं, हल्ल्याचा रचला बनाव; कारण आलं समोर

Pune Summer Heat : पुणे शहरात उन्हाचा तडाखा वाढला; बुधवारी ‘यलो अलर्ट’, तापमान पाऱ्याची चाळिशीकडे झेप

SCROLL FOR NEXT