Maratha Reservation esakal
महाराष्ट्र बातम्या

Maratha Reservation : काय आहे 9 टक्क्यांचा फॉर्म्युला? ओबीसी नेते हरिभाऊ राठोड मनोज जरांगेंच्या भेटीला

मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी ओबीसी नेते हरिभाऊ राठोड दाखल झाले

संतोष कानडे

छत्रपती संभाजी नगरः मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी ओबीसी नेते हरिभाऊ राठोड दाखल झाले आहेत. राठोड यांनी मराठा-ओबीसी संघर्ष टाळण्यासाठी एक फॉर्म्युला सादर केला आहे. मात्र त्यामुळे मराठा समाजावर अन्याय होईल, अशी भूमिका मनोज जरांगेंनी व्यक्त केली.

राजकीय आरक्षणाबद्दल बोलताना हरिभाऊ राठोड म्हणाले की, ओबीसींच्या २७ टक्के आरक्षणाचे तीन भाग करायचे. ९ टक्क्यांच्या एका भागात भटके विमुक्त, दुसऱ्या भागात बारा बलुतेदार आणि तिसऱ्या भागात कुणबी-मराठा-लेवा पाटील यांचा समावेश करता येईल.

यावेळी मराठ्यांच्या शैक्षणिक आणि नोकरीतील आरक्षणाच्या फॉर्म्युला ऐकून घेतल्यानंतर मनोज जरांगे पाटलांनी तो अमान्य केला. त्यामुळ ५ टक्के मराठा समाजावर अन्याय होईल आणि त्या दीड कोटी मराठा बांधवांना कोण अंगावर घेणार? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मात्र राठोड यांनी तसं होणार नसून शंभर टक्के मराठा बांधवांना आरक्षण मिळेल, असं म्हटलं. नेमकं त्यांना काय म्हणायचं होतं, याची स्पष्टता झालेली नाही.

मराठ्यांना ओबीसीमध्ये घेऊन आरक्षणाची मर्यादा वाढवण्याची गरज आहे, अशी भूमिका जरांगे पाटलांनी व्यक्त केली. हरिभाऊ राठोड म्हणाले की, ओबीसी आणि मराठा समाजाला समान सवलती मिळाव्यात. त्यावर जरांगे म्हणाले, आगोदर आम्हाला आरक्षण तर मिळू द्या.. मग पुढच्या गोष्टी बघू. तुमचा फॉर्म्युला ऐकला तर पाच टक्के मराठा आरक्षणाच्या बाहेर राहतील. त्या मराठ्यांना कोण अंगावर घेईल. त्यांच्यावर अन्याय का करायचा?

मनोज जरांगे पाटील पुढे म्हणाले की, मराठ्यांच्या ५४ लाख नोंदी सापडल्या आहेत. त्यामुळे सरसकट आरक्षण देता येतं. पंरतु ओबीसी नेत्यांनी सरसकट या शब्दाचा विनाकारण बाऊ केला. पाच कोटी मराठे आत येणार असं सांगितलं जात आहे. परंतु ते खरं नाही. कारण विदर्भ, खान्देश, कोकण, पश्चिम महाराष्ट्र येथील बहूतांश मराठे ओबीसीमध्ये आहेत. नोंदी सापडूनही ओबीसी नेते आरक्षणाला विरोध करीत आहेत. मराठ्यांच्या नोंदी नसत्या तर वेगळा प्रश्न होता. परंतु नोंदी सापडल्या आहेत. त्यामुळे मराठ्यांना विरोध करण्यात अर्थ नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIDEO : भीषण अपघात! भरधाव येणाऱ्या मॅजिक व्हॅनची ट्रकला धडक, नऊ जणांचा जागीच मृत्यू

सायली-प्रिया दोघीही आई होणार! ठरलं तर मग मालिकेत मोठा ट्वीस्ट, प्रोमो पाहून नेटकरी म्हणाले...

Ghodegaon Accident: घोडेगाव–भीमाशंकर रस्त्यावर भीषण अपघात; समोरासमोर धडकेत रिक्षा चालकाचा मृत्यू, घोडेगाव परिसरात हळहळ..

Riyan Parag:'... तर आम्ही प्लेऑफमध्ये पोहचणार नाही', दिल्लीविरुद्धच्या पराभवानंतर नेमकं काय म्हणाला रियान पराग?

राज्यातील पुन्हा निवडणुकीची रणधुमाळी, विधानपरिषदेच्या १६ जागांसाठी निवडणूक जाहीर, कधी होणार मतदान?

SCROLL FOR NEXT