maratha reservation esakal
महाराष्ट्र बातम्या

Manoj Jarange : ''डॉक्टरांनी सांगितलं, तुम्हाला एक किडनी नाही'', जरांगेंना आलं टेन्शन; सरकारचा काय होता डाव?

संतोष कानडे

राजगुरुनगरः मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील हे शुक्रवारी पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. राजगुरुनगरमध्ये आयोजित सभेत बोलताना त्यांनी उपोषणादरम्यान आपल्यावर कसे डाव टाकले होते, याबाबत माहिती दिली.

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, २२ ऑक्टोबर रोजी मी मराठा आरक्षण आंदोलनाची भूमिका जाहीर करणार आहे. मग ते आंदोलन सरकारला पेलवणार ही नाही आणि झेपणारही नाही. त्यामुळे सरकारने मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची भूमिका जाहीर करावी, असं आवाहन त्यांनी केलं.

उपोषणादरम्यान सरकार आपल्यावर डाव टाकत होतं. परंतु आपणही त्यांना पुरुन उरलो, असं जरांगेंनी सांगितलं. मनोज जरांगे म्हणाले की, सध्या आम्ही शांत आहोत म्हणजे प्रश्न विसरलो आहोत असं नाही. आम्ही पूर्ण तायरीनिशी कामाला लागलो आहोत. मराठा मुर्दाड आहेत, अशी टीका केली जाते. परंतु इथं येऊन बघा मराठे मुर्दाड आहेत की धारदार आहेत.

जरांगे म्हणाले की, हा शेवटचा डाव आहे... आपल्याला जिंकायचं आहे. तुम्हाला उचकवण्याचा प्रयत्न केला जाईल परंतु आपल्याला शांत राहून आरक्षण मिळवायचं आहे. सरकार आपल्यावर डाव टाकण्याच्या प्रयत्न करत आहे.

''जेव्हा मी उपोषणाला बसलो होतो. तेव्हा त्यांचा डॉक्टर सांगतो, मला किडनीच नाही. मी फुल टेन्शनमध्ये आलो. माझ्या बापाने कधी तपासलं की नाही, असं वाटलं. एका किडनीवर मी ३५ उपोषणं कशी केली असतील, असा प्रश्न मलाच पडला. उपोषण आटोपल्यानंतर गॅलेक्सी हॉस्पिटलला दाखल झालो तेव्हा डॉक्टरला आधी विचारलं अगोदर किडन्या आहेत का नाही तपासा. त्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं दोन्ही किडन्या आहेत. ही सत्य घटना आहे.''

जरांगे पुढे म्हणाले की, सरकारने दुसराही डाव टाकला होता. माझ्याजवळ सरकारचे लोक आले आणि बाजूला चला.. बाजूला चला असं म्हणायला लागले. मी हटलो नाही. त्यांनी नुसत्या शेंगा झोडल्या. मीही त्यांना गप्पा मारल्या पण मागे हटलो नाही. समाजाशी गद्दारी करणारी माझी पैदास नाही, असं शेवटी जरांगे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Cotton Market : कापूस बाजारात 'मंदीची' सरकी; १५ लाख गाठींचे उद्दिष्ट असताना साडेसात लाखांवरच हंगाम आटोपला!

रायगडाच्या पायवाटेवर 'कमळी'चा स्वराज्याचा जागर! चित्रीकरणादरम्यान विजया बाबर झाली भावूक; म्हणाली...

Jalgaon News : जळगावात थरार! सिलिंडरच्या स्फोटात तीन घरे जळून खाक, डोळ्यांदेखत संसाराची झाली राखरांगोळी

Latest Marathi News Update : धक्कादायक! जळगाव जिल्ह्यात ‘दूषित’ पाणीपुरवठा

Sunil Tatkare On NCP: अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार का? भवितव्य सांगून सुनील तटकरेंचं मोठं वक्तव्य; काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT