marathi bhasha din savarkar  esakal
महाराष्ट्र बातम्या

Marathi Bhasha Din : राज्याचे अर्थसंकल्प सादर होण्यातही आहे सावरकरांचे योगदान? जाणून घ्या कसे

इंग्रजीतील सॅलरी, डायरेक्टर, टेलिफोनला मराठी भाषेत स्थान देण्यात सावरकरांचे योगदान

सकाळ डिजिटल टीम

आज मराठी भाषा गौरव दिन. मराठी साहित्य ज्यांच्याशिवाय पूर्ण होऊच शकत नाही असे कवि विष्णू वामन शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस.

आज्जीच्या पदरासारखा मळकट कस्तूरी गंध तिला, जणू काळजाच्या पारंबीला शब्द व्यंजनांचा उंच झूला!, असा मराठी भाषेचा गोडवा आहे. मराठीवर नितांत प्रेम करणारे लोक लाखो भेटतील पण मराठी भाषा टिकावी यासाठी प्रयत्न करणारे मोजकेच म्हणावे लागतील. त्यापैकीच एक म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर होय. सावरकरांनी मराठीसाठी केवळ लढा दिला नाही तर तिच्यात अनेक नव्या शब्दांची भर टाकली आहे.

आज सर्रासपणे वापरले जाणारे दिग्दर्शक, निर्देशक हे शब्द आपल्याला सावरकरांनीच आपल्याला दिले आहेत. मराठी आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचे एक वेगळेच नाते आहे. त्याबद्दल भालजी पेंढारकर यांनी  ‘स्टुडिओचे आत्मवृत्त’ या पुस्तकात एक प्रसंग लिहिलाय आहे.

एकदा काहीतरी निमित्ताने सावरकर त्यांच्या स्टुडिओमध्ये गेले होते. स्टुडिओ बघत असताना प्रत्येक कक्षावर त्यांना ‘डायरेक्टर’, ‘प्रोड्युसर’, ‘असिस्टंट डायरेक्टर’, ‘कोरिओग्राफर’, ‘फोटोग्राफर’ अशा पाट्या लावलेल्या दिसल्या.

सावरकरांना हे चांगलंच खटकलं, त्यांनी त्वरित त्याला पर्यायी मराठी शब्द शोधून काढले. आपण आज जे ‘निर्देशक’, ‘दिग्दर्शक’, ‘नृत्य दिग्दर्शक’, ‘छायाचित्रण’ हे शब्द वापरतो हि सावरकरांचीत देणं आहे.

सावरकरांनी मराठीला दिलेलं देणं

दिनांक (तारीख), क्रमांक (नंबर), बोलपट (टॉकी), नेपथ्य, वेशभूषा (कॉश्च्युम), दिग्दर्शक (डायरेक्टर), चित्रपट (सिनेमा), मध्यंतर (इन्टर्व्हल), उपस्थित (हजर), प्रतिवृत्त (रिपोर्ट), नगरपालिका (म्युन्सिपाल्टी), महापालिका (कॉर्पोरेशन), महापौर (मेयर), पर्यवेक्षक ( सुपरवायझर), विश्वस्त (ट्रस्टी), त्वर्य/त्वरित (अर्जंट), गणसंख्या (कोरम), स्तंभ ( कॉलम), मूल्य (किंमत), शुल्क (फी), हुतात्मा (शहीद), निर्बंध (कायदा), शिरगणती ( खानेसुमारी), विशेषांक (खास अंक), सार्वमत (प्लेबिसाइट), झरणी (फाऊन्टनपेन), नभोवाणी (रेडिओ), दूरदर्शन (टेलिव्हिजन), दूरध्वनी (टेलिफोन), ध्वनिक्षेपक (लाउड स्पीकर), विधिमंडळ ( असेम्ब्ली), अर्थसंकल्प (बजेट), क्रीडांगण (ग्राउंड), प्राचार्य (प्रिन्सिपल), मुख्याध्यापक (प्रिन्सिपल), प्राध्यापक (प्रोफेसर), परीक्षक (एक्झामिनर), शस्त्रसंधी (सिसफायर), टपाल (पोस्ट), तारण (मॉर्गेज), संचलन (परेड), गतिमान, नेतृत्व (लिडरशीप), सेवानिवृत्त (रिटायर), वेतन (पगार)

मराठी भाषेविषयी सावरकर लिहीतात की, “आपल्यातील जुन्या शब्दांनी शक्य तितके काम भागवावे, या म्हणण्यावर पुष्कळदा असे विचारण्यात येते की, ‘उपानह,’ ‘जोडा’ इत्यादी जुने शब्द असतानाही ‘शू’ हा शब्द वापरण्यात हानी कोणती? त्याने शब्दसंपत्ती वाढते. पण याच दृष्टीने पाहिले तर मग आजकाल इंग्रजी शिकलेले लोकं शिष्टपणाची भाषा समजून, ‘वाईफ सिक आहे’ म्हणून जे पाहुण्यास सांगतात तेही क्षम्यच म्हणावे लागेल.

कारण पत्नी, अर्धांगिनी, बायको, मंडळी, कुटुंब इत्यादी वाटेल तितके संस्कृत-प्राकृत शब्द मराठीत असताही तो कुटुंबास ‘वाईफ’ म्हणून जे नवे नाव देतो, त्याने तदर्थक शब्दसंपत्ती वाढते असेच म्हणले पाहिजे.

इतकेच शब्दास काय पण ‘बाप,’ ‘पिता,’ ‘वडील,’ ‘जनक’ इत्यादी शब्दास सोडून, ‘फादरनी गेस्टना रिसिव्ह केले’ म्हणून सांगणारी पोरेही ‘फादर,’ ‘मदर,’ ‘सिस्टर’ इत्यादी शब्द भाषेत आणून मराठीची शब्दसंपत्ती वाढविण्याचे महत्कार्य करीत आहेत असे म्हणावे लागेल.

असले दिग्विजय करून, तो कारभार जर आपण एखाद्या रघुप्रमाणे आपल्या भाषेच्या भांडारात ओतू लागलो, तर त्याने शब्दसंपत्ती वाढेल. परंतु, तो शब्दरत्नाकर आपल्या भाषेचा न राहता, जगाच्या भाषेचा एक नवा डेढगुजरी शब्दकोश की काय तो होईल.

केवळ शब्दसंपत्ती वाढविण्याकरिता म्हणून आपले जुने शब्द भाषेत घुसू देणे वा घुसलेले शब्द टिकू देणे, चुकीचे आणि भाषेच्या प्रकृतीस आणि स्वाभिमानास हानिकारक आहे.”

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iPhone 17 Price : आला रे आला, आयफोन आला! iPhone 17, 17 Pro अन् Pro Max स्मार्टफोन भारतात कितीला? किंमत पाहा एका क्लिकमध्ये..

iPhone 17 Series : एकच झलक, सबसे अलग! iPhone 17 झाला लाँच; एकदम खास फीचर्स अन् परवडणारी किंमत, सर्व डिटेल्स पाहा एका क्लिकमध्ये..

iPhone Air Price : कागदासारखा पातळ मोबाईल! iPhone Air लाँच; बघाल तर प्रेमात पडाल, किंमत फक्त...

Apple Watch Series 11 : हे घड्याळ आहे की फीचर्सचा खजिना! Apple Watch Series 11 लाँच, किंमतीपासून अपडेट्स पर्यंत, सर्वकाही जाणून घ्या

AirPods Pro 3 ची धमाकेदार एंट्री; मोजणार हृदयाचे ठोके अन् करणार लाईव्ह ट्रान्सलेशन, 15 जबरदस्त फीचर्स, किंमत फक्त...

SCROLL FOR NEXT