representational image
representational image 
महाराष्ट्र

'खड्डेमुक्त महाराष्ट्र'ची डेडलाईन संपली; तुमच्या भागातल्या रस्त्यांचं काय? 

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : ''एक नंबर खड्डे बुजवले.. चोख काम केलंय' असं मोघम सांगून अधिकाऱ्यांना पाटी टाकता येणार नाही किंवा पाठ थोपटून घेता येणार नाही' असं बजावलं होतं खुद्द सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी.. संपूर्ण महाराष्ट्र खड्डेमुक्त करण्यासाठी चंद्रकांतदादांनी 15 डिसेंबरची म्हणजेच आजचीच 'डेडलाईन' दिली होती. विशेष म्हणजे, 'रस्ता खरोखरच चांगला झाला आहे, खड्डे नीट बुजवले आहेत याचे प्रमाणपत्र त्या भागातील गर्भवती महिला, कॉलेज युवती, ज्येष्ठ नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि सरपंचांकडून घावे लागणार आहे' अशी अटही त्यांनी घातली होती. 

'खड्डे मुक्तीसाठी मंत्रालयात वॉररूम सुरू केली आहे. आठ तासांच्या तीन शिफ्टमध्ये काम होतेय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली. वेबिनारच्या माध्यमातून राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय लोकांशी संवाद साधला आहे', असेही चंद्रकांत पाटील यांनी सांगलीमध्ये गेल्या आठवड्यात सांगितले होते. संपूर्ण राज्य खड्डेमुक्त करण्यासाठी 15 डिसेंबरची मुदत जाहीर करण्यात आली होती. राज्यात 96 हजार किलोमीटर लांबीच्या रस्त्यांवर एकही खड्डा असणार नाही, असेही त्यांनी सांगितले होते. 

तुमच्या भागातील रस्ते खड्डेमुक्त झाले आहेत का, हे तुम्हीच कळवा.. या बातमीखाली तुमची प्रतिक्रिया नोंदवा किंवा तुमच्या भागातील रस्त्यांचा आजचा फोटो काढून तपशीलासह 'ई सकाळ'ला (@eSakalupdate) टॅग करून ट्विट करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT