Udayanraje-Bhosale
Udayanraje-Bhosale 
महाराष्ट्र

उदयनराजे म्हणजे मुक्त विद्यापीठ - मुख्यमंत्री फडणवीस

सकाळवृत्तसेवा

सातारा - उदयनराजे हे राष्ट्रवादीतून निवडून येऊन खासदार झाले असले, तरी उदयन महाराज हे एक मुक्त विद्यापीठ आहे. या विद्यापीठाची संहिता ते स्वत: लिहितात, त्याचे नियम ते स्वत:च तयार करतात. त्या नियमांची अंमलबजावणीही तेच करतात आणि त्यांच्या नियमांचे पालन करणार नाहीत, त्यांना शासनही तेच करतात. म्हणूनच ही तमाम जनता त्यांच्यावर अलोट प्रेम करते, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदार उदयनराजे भोसले यांचा गौरव केला. अजिंक्‍यतारा किल्ला विकासासाठी २५ कोटी रुपये, सातारा शहराची हद्दवाढ व नियोजित मेडिकल कॉलेजसाठी जागा या तिन्ही बाबी लवकर देऊ, असे आश्‍वासनही त्यांनी दिले.

येथील जिल्हा परिषदेच्या मैदानावर आज खासदार उदयनराजे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विविध विकासकामांचे भूमिपूजन व उदयनराजेंचा सत्कार असा संयुक्त समारंभ झाला. त्या वेळी श्री. फडणवीस बोलत होते.

माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, खासदार उदयनराजे भोसले, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री विजय शिवतारे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, आमदार शंभूराज देसाई, जयकुमार गोरे, आनंदराव पाटील, मोहनराव कदम, ज्येष्ठ नेते शिवाजीराजे भोसले, माजी आमदार कांताताई नलावडे, सुभाषराव शिंदे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, माजी खासदार गजानन बाबर, नगराध्यक्षा माधवी कदम, उपाध्यक्ष सुहास राजेशिर्के, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल, पोलिस अधीक्षक संदीप पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे, मुख्याधिकारी शंकर गोरे उपस्थित होते. 

प्रारंभी श्री. फडणवीस व श्री. पवार यांच्या हस्ते उदयनराजे भोसले यांचा सत्कार करण्यात आला. कास तलाव उंची वाढ (४२ कोटी रुपये), भुयारी गटार योजना (५० कोटी) व पोवई नाक्‍यावर ग्रेड सेपरेटर (१५ कोटी) या कामांचे भूमिपूजन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रिमोट कंट्रोलची कळ दाबून व्यासपीठावरून करण्यात आले. 

श्री. फडणवीस म्हणाले, ‘‘उदयनराजे हे मित्रांचा मित्र असलेलं, प्रेमाला प्रेम देणारं आणि त्याचवेळी अन्यायाविरुद्ध लढण्याची वेळ येते, तेव्हा हल्ला बोलणारं व्यक्तिमत्त्व आहे. आज त्यांनी आपल्या जन्मदिनापेक्षा या जिल्ह्याच्या विकासाला प्राधान्य देण्याचा प्रयत्न केला. साताऱ्यात विकासाची कामे झाली पाहिजेत, असा त्यांचा कायम आग्रह असतो. प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळाला पाहिजे, हाच प्रयत्न उदयनराजे करत आहेत.’’

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले...
 अजिंक्‍यताऱ्याच्या विकासासाठी २५ कोटी
 मेडिकल कॉलेजच्या जागेचा प्रश्‍न सोडवणार
 साताऱ्याची हद्दवाढही लवकरच 

शरद पवार म्हणाले...
 उदयनराजेंचा वाढदिवस हा सामान्यांच्या जीवनात परिवर्तनाचा सोहळा
 टीकेपेक्षा उदयनराजेंकडून कायम कामांना प्राधान्य
 शिवरायांचे कार्य देशभर पोचविण्यासाठी उदयनराजेंनी परिश्रम घ्यावेत 

उदयनराजे भोसले म्हणाले...
 शेवटच्या श्‍वासापर्यंत जनतेसाठी लढणार
 सत्ता असो वा नसो जनता माझ्यासाठी महत्त्वाची
 जनतेचे प्रश्‍न सोडवताना कुठेही कमी पडणार नाही

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde : जागावाटपाच्या ‘तिढ्या’वर चर्चा ; कोल्हापूर दाैऱ्यात शिंदेंच्या भेटीगाठी

Fact Check: उद्धव ठाकरेंना काँग्रेस कार्यकर्ते बोलू देत नसल्याचा दावा खोटा; प्रचार सभेतील अर्धवट व्हिडिओ व्हायरल

काँग्रेसला मोठा धक्का! दिल्ली काँग्रेस प्रदेशाध्यक्षाने दिला पदाचा राजीनामा, सांगितलं कारण

IPL 2024: राजस्थानची प्लेऑफच्या दिशेने घौडदौड, तर मुंबईच्या अडचणी वाढल्या; जाणून घ्या पाँइंट्स - टेबलची स्थिती

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान मोदींची उद्या पुण्यात सभा; सुमारे दोन लाख नागरिक उपस्‍थित राहणार

SCROLL FOR NEXT