Maruti taboo village

 

esakal

महाराष्ट्र बातम्या

Maruti taboo village : महाराष्ट्रातच आहे असं एक गांव जिथं कुणीच काढत नाही 'Maruti' कारचं नाव; हनुमानाचं मंदिरही नाही!

strange village in Maharashtra : जाणून घ्या, नेमकं काय आहे कारण, ग्रामस्थांचं नेमकं काय आहे म्हणणं?

Mayur Ratnaparkhe

Maruti cars are avoided in Nandur Nimba Daitya village : महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात, शहरातच नव्हे तर प्रत्येक गावात मारूतीचं मंदिर आहे, याची आपल्याला कल्पना आहे. मात्र, महाराष्ट्रातच एक गाव असंही आहे की, जिथं मारूतीचं नावही काढलं जात नाही. त्यामुळे त्या गावात कुणी मारूती कंपनीची कारही घेत नाही आणि गावात मारूतीचं मंदिरही नाही.

होय हे खरंय, अहमदनगर जिल्ह्यातील नांदूर निंबा दैत्य या लहानशा गावात आजही मारूती कार कुणीच खरेदी करत नाही किंवा मारूती कंपनीची वाहनं दिसत नाही. एवढंच नाहीतर गावात मारूतीचं मंदिरही नाही. यामुळे हे गाव सर्वांचे लक्ष वेधून घेते. गावाच्या या अलिखित नियमामागे एक अख्यायिका दडलेली आहे.

विशेष म्हणजे येथील ग्रामस्थांची गावातील रक्षक देवता निंबा दैत्य यावर श्रद्धा आहे. गावकऱ्यांचा विश्वास आहे की, शतकांपूर्वी निंबा दैत्य आणि भगवान हनुमान(मारूती) यांच्यात मोठा वाद निर्माण झाला होता. आख्यायिकेनुसार या दोघांच्या वादाते अखेर प्रभू श्रीरामांना मध्यस्थी करावी लागली. यानंतर मग प्रभू रामाने निंबा दैत्याला गावाचे रक्षण करण्याचा अधिकार दिला आणि हनुमानाला त्या परिसरापासून दूर राहण्याची सूचना दिली.

तेव्हापासून गावात मारूतीचं नाव काढणे, पूजा करणे निषद्ध आहे. याशिवाय, अगदी मारूती कार देखील कुणी घेत नाही. तसेच, मुलांची नावं मारूती किंवा हनुमान असं नाव ठेवली जात नाही. गावकऱ्यांची अशी भावना आहे की, मारूती नावाशी निगडीत गोष्टींमुळे संकट ओढावते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raigad Video : 352 वर्षांपूर्वी कसे झालेले 'रायगड'चे बांधकाम? शिवरायांच्या काळातले अस्सल चित्र डोळ्यासमोर उभा करणारा AI व्हिडिओ व्हायरल

BMCच्या शाळांमधील सीबीएसईची पहिली तुकडी देणार दहावीची परीक्षा, ३३६ विद्यार्थ्यांचा समावेश

Latest Marathi News Live Update : जिल्हा परिषद निवडणूक प्रकरणावर आज सुनावणी झालीच नाही

Sangli ZP : “चार तालुके सुरक्षित, सहा तालुक्यांत काँग्रेसची कसोटी!” सांगली राजकारणात अस्तित्वाची लढाई

KDMCमध्ये राजकीय उलथापालथ! सत्तेसाठी शिंदेंची खेळी, मनसेच्या पाठिंब्यानं समीकरणच बदललं; भाजपसह उद्धव ठाकरेंना धक्का

SCROLL FOR NEXT