Hemant Patil 
महाराष्ट्र बातम्या

Maratha Resrevation: हेमंत पाटील यांचा खासदारकीचा राजीनामा! लोकसभा अध्यक्षांच्या कार्यालयाकडं केला सादर

मराठा आरक्षणाचा प्रश्न गंभीर बनल्याची माहिती हेमंत पाटील अध्यक्षांना देणार आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील आज मराठा आरक्षणासाठी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला भेट घेऊन राजीनामा देण्याची शक्यता वर्तवली जात होती. प्रत्यक्ष बिर्ला यांची भेट घेऊन ते राजीनामा देणार होते. पण ही भेट होऊ शकली नाही तरी त्यांनी अध्यक्षांच्या कार्यालयाकडं दुपारी आपला राजीनामा सोपवला. (May MP Hemant Patil resign for Maratha reservation Will meet the Lok Sabha Speaker)

आरक्षणाचा प्रश्न चिघळला

राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न चिघळला आहे. मनोज जरांगे यासाठी उपोषण करत आहेत, उपोषणाचा त्यांचा पाचवा दिवस आहे. त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. पण अद्याप आरक्षणाबाबत तोडगा निघू शकलेला नाही. यापार्श्वभूमीवर काल खासदार हेमंत पाटील यांनी मराठा समाजातील आंदोलकांसमोर राजीनामा दिला होता. (Latest Marathi News)

राजीनामा मंजूर होणार का?

यापार्श्वभूमीवर आज लोकसभा अध्यक्षांची भेट घेऊन हेमंत पाटील राज्यातील आरक्षणाचा प्रश्न किती गंभीर आहे हे त्यांच्या निदर्शनास आणून देणार होते. तसेच आपला राजीनामा सादर करतील असं सांगितलं जात होतं. त्यांची भेट होऊ शकली नाही पण त्यांनी आपला राजीनामा अध्यक्षांच्या कार्यालयात सुपूर्द केला. यानंतर त्यांचा राजीनामा अध्यक्ष मंजूर करतात का? हे पाहावं लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kapil Sibal on Supreme Court: सर्वोच्च न्यायालयावरच प्रश्नचिन्ह! कपिल सिब्बल स्पष्टच बोलले; "आता कोर्टात जाण्यात अर्थ नाही, विश्वास उडाला!"

Maharashtra Live News : अभिजीत दिपकेंच्या आजीचे अंत्यसंस्कार थांबवले; आईंचा दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप

YCM Hospital Incident : धक्कादायक ! पिंपरी-चिंचवडमध्ये धावत्या रुग्णवाहिकेतून रुग्ण रस्त्यावर पडला; वायसीएम रुग्णालयातील प्रकार, VIDEO VIRAL

Navratri Festival : आदिमायेच्या उत्सवाला प्रारंभ;घटस्थापनेसाठी दुपारी दीड वाजेपर्यंत मुहूर्त

Tuljabhavani Temple: तुळजापूरला नवरात्रोत्सवाची तयारी पूर्ण ;तुळजाभवानी मातेच्या मंदिरात आज घटस्थापना

SCROLL FOR NEXT