Sambhaji Patil Nilangekar
Sambhaji Patil Nilangekar esakal
महाराष्ट्र

'निलंगेकरांच्या'पत्राची'देशमुखाकडून'दखल, वैद्यकीय शिक्षण प्रवेश प्रक्रिया सुरु

राम काळगे

निलंगा (जि.लातूर) : वैद्यकीय शिक्षण प्रवेशासाठी नीट परीक्षा (NEET Exam) क्रमप्राप्त असून याचा निकाल लागून दीड महिना लोटला आहे. मात्र राज्य शासनाकडून वैद्यकीय शिक्षण प्रवेश प्रक्रिया सुरु केली नव्हती. देशातील इतर राज्यांच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य शासनानेही प्रवेश प्रक्रिया सुरु करून विद्यार्थ्यांच्या वेळेची बचत करावी, अशी मागणी माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) व वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख (Amit Deshmukh) यांच्याकडे २४ डिसेंबर रोजी पत्राद्वारे केली होती. निलंगेकर यांच्या पत्राची तात्काळ दखल घेत वैद्यकीय शिक्षण प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे. सध्या लातूर (Latur) जिल्ह्यात काँग्रेस (Congress) व भाजपा (BJP) दोन्ही राजकीय पक्ष सक्षम असून महाविकास आघाडीच्या विरोधात व विद्यमान पालकमंत्री अमित देशमुख यांच्या टीका करण्यास एकही संधी माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर (Sambhaji Patil Nilangekar) सोडत नाहीत. तरीही पालकमंत्री अमित देशमुख यांच्याकडे वैद्यकीय खाते असल्यामुळे त्यानी या मागणीची तत्परतेने दखल घेत वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. (medical education process starts, sambhaji patil nilangekar write letter amit deshmukh)

वैद्यकीय शिक्षणासाठी क्रमप्राप्त असलेल्या नीट परीक्षेचा निकाल दीड महिन्यापुर्वी लागेलेला आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल झाल्याने राज्य शासनाने वैद्यकीय शिक्षण प्रवेश प्रक्रिया सुरु केलेली नव्हती. या याचिकेवर ६ जानेवारी २०२२ रोजी सुनावणी होणार आहे. याचिका दाखल झालेली असली तरी सर्वोच्च न्यायालयाने प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यासह गुणवत्ता यादीची प्रक्रिया पुर्ण करण्यास स्थगिती दिलेली नाही. ही बाब माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी पत्राद्वारे राज्य शासनाच्या निदर्शनास आणून देत विद्यार्थ्यांचा वेळ वाचण्यासाठी वैद्यकीय शिक्षण प्रवेश प्रक्रिया सुरु करावी अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्याकडे केलेली होती.

या पत्रात निलंगेकरांनी देशातील गुजरात, कर्नाटक, केरळ यासह इतर राज्यांनी प्रवेश प्रक्रिया सुरु केली असल्याचे लक्षात आणून दिले होते. ही प्रक्रिया सुरु केल्यास विद्यार्थ्यांच्या एक ते दीड महिना वेळेची बचत होणार असल्याने ही प्रक्रिया तात्काळ सुरु करावी अशी मागणी आमदार निलंगेकर यांनी केली होती. त्यांनी २४ डिसेंबर रोजी दिलेल्या पत्राची तात्काळ दखल राज्य शासनाकडून घेतली आहे. वैद्यकीय शिक्षण प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आलेली असून या संदर्भात राज्य सामाईक प्रवेश सेलने नोटिफिकेशन काढलेले आहे. त्यानुसार ता.३० डिसेंबर ते ५ जानेवारी यादरम्यान विद्यार्थ्यांना ऑनलाईन नोंदणी आणि नोंदणी शुल्क भरता येणार आहे. ता.३ डिसेंबर ते ६ जानेवारी या दरम्यान विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेसंदर्भात आवश्यक असणारी कागदपत्रे पोर्टलवर अपलोड करावी लागणार आहेत तर ता. ८ जानेवारी रोजी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. माजी मंत्री आमदार निलंगेकर यांनी केलेल्या मागणीमुळे ही प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असल्याने विद्यार्थ्यांसह पालकांतून आनंद व्यक्त करण्याबरोबर माजी निलंगेकर यांचे आभार व्यक्त केले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CAA Beneficiary: आधी सीएएची प्रमाणपत्रं वाटली आता तेच लाभार्थी थेट मोदींसोबत स्टेजवर!

IPL 2024 RCB vs CSK Live Score: विराटच्या सुरुवातीच्या तुफानानंतर बेंगळुरूत पावसाचं आगमन, सामना थांबला

Virat Kohli RCB vs CSK : मी एप्रिलमध्येच बॅग पॅक केली होती.... विराटला स्वतःच्या संघावर विश्वास नव्हता?

मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, सहा महिन्यात POK भारताचा भाग होईल; योगींची मोठी घोषणा

Latest Marathi News Live Update : हे मोदींचे युग आहे, आम्ही घरी घुसून मारतो- पंतप्रधान मोदी

SCROLL FOR NEXT