Jayant Patil esakal
महाराष्ट्र बातम्या

राष्ट्रवादीच्या सैन्यांमुळं कोणतीही लढाई सहज जिंकू : जयंत पाटील

हेमंत पवार

'सैन्य जर सोबत असेल तर कोणतीही लढाई सहजरित्या जिंकता येते.'

कऱ्हाड (सातारा) : सैन्य जर सोबत असेल तर कोणतीही लढाई सहजरित्या जिंकता येते. त्यामुळे सक्षम बूथ बांधणी करून सैन्य निर्माण केले पाहिजे. पक्षाची सभासद नोंदणी करताना तालुक्यातील सर्व स्तरावरील लोकांना सहभागी करून घ्यावे, अशा सूचना जलसंपदामंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी येथे केल्या.

राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या पाचव्या पर्वात प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी कऱ्हाड उत्तर व दक्षिण विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेऊन येथील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. पालकमंत्री बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil), खासदार श्रीनिवास पाटील (Shrinivas Patil), महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, जिल्हाध्यक्ष सुनील माने, युवक कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ समिती सभापती मानसिंगराव जगदाळे, कऱ्हाड उत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष देवराज पाटील, पंचायत समितीचे सभापती प्रणव ताटे, पश्चिम महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या अध्यक्षा संगीता साळुंखे, युवक जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे, युवती जिल्हाध्यक्षा पूजा काळे, सुहास कदम, स्मिता देशमुख, सीमा जाधव, जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील, पालिकेचे माजी उपनगराध्यक्ष सुभाष पाटील, कऱ्हाड दक्षिणचे अध्यक्ष संतोष पाटील, ॲड. राजाभाऊ पाटील-उंडाळकर, स्थानिक स्वराज्य संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी, सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे आजी-माजी संचालक, तसेच पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

पालकमंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले,‘‘ पक्षात काम करताना पक्षाची भूमिका ही प्रत्येक गावातील लोकांपर्यंत पोचली पाहिजे. त्यासाठी पदाधिकाऱ्यांनी काम करणे गरजेचे आहे. पदाधिकाऱ्यांनी काम करून पक्षाची भूमिका तळागाळातील लोकांपर्यंत पोचवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी प्रयत्न करावे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीने गुन्हा केला कबूल, पोलिस तपासात धक्कादायक माहिती समोर

Kolhapur Crime News : कोल्हापुरात कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा! किरकोळ वादातून दोन निर्घृण खून, सख्खा भाऊ बनला पक्का वैरी

Beed News: घरकुल घोटाळ्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे; केज येथील ‘सकाळ’ने उघड केलेला सव्वाचार कोटींचे प्रकरण

Nashik Highway: नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी, हजारो वाहने अडकली; वाहनचालकांसह प्रवासी संतापले, टोल भरूनही त्रास!

Kolhapur Girl End Life : कल्याणीला भिती नववी नापास होण्याची, कोणालाही न सांगता तिने जे केलं ते धक्कादायक; कोल्हापुरातील घटनेने हळहळ

SCROLL FOR NEXT