Raj Thackeray
Raj Thackeray Sakal
महाराष्ट्र

राज ठाकरेंच्या सुरक्षेबाबत गृहमंत्र्यांना पत्र; बैठकीनंतर नांदगावकरांची माहिती

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) आगामी १ मे सभा आणि अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आज पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत पक्षाच्या आगामी कार्यक्रमांबाबत सविस्तर चर्चा झाली, अशी माहिती मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. (Meeting of office bearers of MNS with Raj Thackeray What happened in that)

नांदगावकर म्हणाले, या बैठकीला महाराष्ट्रातील अनेक पदाथिकारी आले होते. १ मे रोजी होणाऱ्या औरंगाबादच्या सभेसाठी सगळी तयारी करण्यात आली आहे. त्याचबरोबर अयोध्येच्या ५ जूनच्या दौऱ्यावर राज ठाकरे जाणार आहेत. त्याचीही सगळी तयारी करण्यात आली आहे. या दौऱ्यासाठीची सध्या चर्चा सुरु आहे. त्याचबरोबर अक्षय तृतीयेला मनसेचे कार्यकर्ते परवानगी घेऊन हनुमान चालिसा पठण करणार आहेत. यावेळी राज ठाकरेंकडून महापूजेची सूचना देण्यात आली आहे.

राज ठाकरेंच्या सभांसाठी रेकी केलीए

राज ठाकरेंच्या सभांसाठी आम्ही रेकी करून आलो आहोत. कशा पद्धतीने काय करायचं? हे आम्ही ठरवत आहोत. अयोध्येसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. अयोध्या दौऱ्यासाठी ट्रेन उपलब्ध करून देण्यासाठी मनसेकडून नितीन सरदेसाई यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना पत्र लिहिलं आहे.

सुरक्षेबाबत गृहमंत्र्यांना पत्र

राज ठाकरेंना केंद्र सरकरकडून अतिरिक्त सुरक्षा पुरवली जाण्याची चर्चा होती. यापार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या बाबतीत राज्याच्या गृहमंत्र्याना आम्ही पत्र लिहिलं आहे, याची कल्पना राज ठाकरेंना दिली आहे. फेब्रुवारी महिन्यात गृहमंत्र्यांना पत्र दिलं होतं पण त्यावर काहीही झालं नव्हतं, आता परत राज्य आणि केंद्र सरकारला पत्र लिहिलं आहे, असंही यावेळी नांदगावकर यांनी सांगितलं.

भोंग्यांबाबत सरकारच्या गाईडलाइन्सनंतर अजेंडा ठरवणार

दरम्यान, मशिदीवरील भोंग्यांबाबत ३ मे रोजीच्या मनसेच्या अल्टिमेटमवर सरकारच्या गाईडलाईन्स आल्यानंतर आम्ही आमचा अजेंडा ठरवणार आहोत, असंही यावेळी नांदगावकर यांनी सांगितलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT