Ananad Dave, Devendra Fadnavis and Eknath Shinde 
महाराष्ट्र बातम्या

"महाराष्ट्राच गुजरातमध्ये विलीन करा"; प्रकल्प हातचा गेल्यानंतर ब्राह्मण महासंघाची टीका

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : सुमारे दीड लाख कोटी रुपयांची गुंतवणूक असलेला वेदांता-फॉक्सकॉन हा मेगा प्रकल्प महाराष्ट्रातून आधीच गुजरातमध्ये गेला आहे. त्यानंतर आता एअरबस हा प्रकल्प देखील गुजरातमध्ये गेला आहे. तब्बल २२ हजार कोटींच्या गुंतवणुकीचा हा प्रकल्प होता. यावरून राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर चहुबाजूने टीका होत आहे. त्यातच आता ब्राह्मण महासंघाने जोरदार टीका केली आहे. (After Vedanta Foxcon Bulk Drugs Park now another project towards Gujarat)

एअरबस सी-295 लष्करी ट्रान्सपोर्ट एअरक्राप्ट प्रकल्प महाराष्ट्राऐवजी बडोद्यात होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ३० ऑक्टोबर रोजी या प्रकल्पाचे उद्घाटन करणार आहे. यावर ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी थेट "महाराष्ट्रच गुजरातमध्ये विलीन करा अशी खोचक टीका केली आहे.

आनंद दवे म्हणाले, एक नंबरवरील महाराष्ट्र 5व्या नंबरवर चालला आहे. मात्र सगळे राजकारण करण्यातच दंग आहेत. त्यामुळे बाकरवडी आणि ढोकळा एकत्र करा असही दवे म्हणाले.

वास्तविक पाहता, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी महिनाभरापूर्वीच म्हटलं होतं की, एअरबस प्रकल्प महाराष्ट्रात येणार आहे. टाटाच्या कोलॅब्रेशनसोबत हा प्रकल्प येणार आहे. मात्र तरी हा प्रकल्प गुजरातला गेला आहे. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारच्या धोरणावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kundan Sankhe Arrested : पालघर रिलीफ रुग्णालय राडा प्रकरण; निलंबित शिवसेना जिल्हाप्रमुखासह आठ जणांची पोलिसांसमोर शरणागती, राहुल घरतसह 22 जणांना पोलिस कोठडी

लालबागचा राजाचं दर्शन घ्यायचंय? जाणून घ्या पूजा आणि आरतीची वेळ, पाहा LIVE VIDEO

‘दुःखी असलात तरी फॅशनेबल दिसावं लागतं...’; प्रीती झिंटा कलाकारांबद्दल स्पष्टच बोलली, म्हणाली...

Marathi News Live Updates : लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी; अमित शाहांसह उद्धव ठाकरे आज बाप्पाचं घेणार दर्शन

MPSC Exam Pattern : एमपीएससी प्रश्नपत्रिकांची सुरक्षितता अन् वेळापत्रक बदलणार? कृती दलाचे सदस्य डॉ. प्रवीण गेडाम अंतिम अहवालाबाबत नेमके काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT