File photo
File photo 
महाराष्ट्र

"एमजीआयएमएस'ची रुग्णसेवा गौरवास्पद : राष्ट्रपती

सकाळ वृत्तसेवा

वर्धा : महात्मा गांधी यांची रुणसेवेची परंपरा आणि प्रेरणा गाठिशी असलेल्या महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेने (एमजीआयएमएस) ग्रामीण भागातील लोकांना दर्जेदार आरोग्य सुविधा पुरविल्या. सोबतच सेवाभावी डॉक्‍टरांच्या पिढ्या घडविल्या. आपल्या 50 वर्षांच्या वाटचालीत संस्थेने मिळविलेला नावलौकिक, विश्वास उल्लेखनीय आहे, असे गौरवोद्गार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी काढले.
सेवाग्राम येथील महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेच्या रौप्य महोत्सवी समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाला सविताजी कोविंद, राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संस्थेचे अध्यक्ष धीरूभाई मेहता यांची प्रमुख उपस्थिती होती.
या संस्थेद्वारे मूल्यवर्धित शिक्षण दिले जाते, हे फार महत्त्वाचे आहे. आपल्याकडे जगातील 18 टक्के लोकसंख्या आहे, तर 20 टक्के आजार आहेत. आपण आयुष्यमान भारत सारखे कार्यक्रम राबवित आहोत. आधुनिक काळात नवनवीन आजार थोपविणे आणि नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा पुरविण्याकरिता आपल्या संस्थेचे, येथून तयार होणाऱ्या डॉक्‍टरांचे योगदान राहीलच. वैद्यकशास्त्रातील अद्ययावत ज्ञान आत्मसात करून आपण समाजसेवेची परंपरा कायम ठेवावी, अशी शुभेच्छाही राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दिल्या. तत्पूर्वी, त्यांनी सेवाग्राम आश्रमाला भेट देऊन बापूकुटीचे दर्शन घेतले व परिसराची पाहणी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT