MHADA
MHADA  sakal
महाराष्ट्र

Mhada Exam Fraud: तीन आरोपींविरूद्ध 3500 पानांचे दोषारोपपत्र दाखल

सकाळ वृत्तसेवा

पुणे : म्हाडा परीक्षा पेपरफुटी प्रकरणात सायबर पोलिसांनी तीन आरोपींविरूद्ध न्यायालयात तीन हजार ५०० पानांचे दोषारोपपत्र दाखल केले आहे. तपासादरम्यान जप्त करण्यात आलेल्या साधनांमधून आरोपींविरूद्ध सबळ पुरावा उपलब्ध झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

जी. ए. टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा संचालक डॉ. प्रितिश देशमुख, एजंट अंकुश हरकळ आणि संतोष हरकळ या तिघांविरोधात प्रथमवर्ग न्यायदंडााधिकारी श्रध्दा डोलारे यांच्या न्यायालयात हे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. म्हाडा पेपरफुटी प्रकरणी आतापर्यंत एकूण सहाजणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये देशमुख आणि हरकळ बंधू यांच्यासह जमाल इब्राहीम पठाण (वय ४७,रा. लातूर), कलीम गुलशेर खान (वय ५२, रा.बुलढाणा) आणि दिपक विक्रम भुसारी (वय ३२,रा.बुलढाणा) या आरोपींना अटक करण्यात आली आहे.

पुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, आर्थिक व सायबर गुन्हे पोलिस उपआयुक्त भाग्यश्री नवटके, सहायक आयुक्त विजय पळसुले यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक डी.एस. हाके व पोलिस निरीक्षक मीनल सुपे-पाटील यांनी हा तपास केला. आरोग्य भरती, पोलिस भरती आणि एमपीएससी परीक्षांमधील घोटाळ्यानंतर म्हाडा अंतर्गत घेण्यात येणाऱ्या विविध पदांच्या परीक्षांचा पेपर फुटीचा प्रयत्न झाल्याने राज्यात एकच खळ्बळ उडाली होती. म्हाडाच्या परीक्षांच्या नियोजनांचे काम जी.ए सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी प्रा.लि कंपनीलाच देण्यात आले होते.

म्हाडा पेपर फुटी प्रकरणाच्या रँकेटची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार या गुन्हाचा तपास करीत आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांची पथके औरंगाबाद, बीड, जालना, पुणे, ठाणे येथे पाठविण्यात आली होती.

संतोष हरकळ आणि अंकुश हरकळ यांच्या हालचालीवर पोलिसांचे होते लक्ष :

पोलिसांचे पथक हे संतोष हरकळ आणि अंकुश हरकळ यांच्या संशयित हालचालींवर लक्ष ठेवून होते. हे दोघे पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात डॉ. देशमुख यांना भेटणार होते. तिथेच देशमुख हा पेनड्रायव्हमध्ये पेपर घेऊन दोघांना देणार होता. त्यांच्याकडे पेनड्रायव्हरमध्ये पेपर सापडले. दोघांना परीक्षार्थींचे पेपरसाठी फोन येत होते. या सर्वगोष्टींचे पुराव्याच्या आधारावर या पेपरफुटी प्रकरणात तिघांचा समावेश असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यानुसार तिघांविरूद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: 'प्रज्वल रेवण्णांचे व्हिडिओ आताचे नाहीत'; पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच केलं थेट भाष्य

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. हर्षवर्धन पाटील यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क..

Election Ink: इतिहास निवडणूक शाईचा; जाणून घ्या कुठे अन् कशी तयार होते मतदारांच्या बोटाला लागणारी शाई

IND vs BAN Women's T20 : चौथ्या ट्वेन्टी-२० सामन्यातही भारताचा बांगलादेशवर विजय

Mumbai News : नरेश गोयल यांना उच्च न्यायालयाचा दिलासा! २ महिन्यांचा मिळाला अंतरिम जामीन

SCROLL FOR NEXT