arrested sakal
महाराष्ट्र बातम्या

म्हाडा व टीईटी प्रकरण: दोन दलालांना अटक; पुणे पोलिसांची कारवाई

अधिकारी व उमेदवार यांच्यामध्ये मध्यस्थी करणाऱ्या अनेक दलालांनाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : म्हाडा पेपरफुटी व शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) गुणवाढीच्या प्रकरणात पुणे पोलिसांच्या सायबर शाखेच्या पथकाने आणखी दोन दलालांना शनिवारी नाशिक व बुलढाणा येथून अटक केली. (Mhada And TET Exam Fraud Case)

दीपक विक्रम भुसारी (वय 32, रा. अयोध्यानगर, बुलढाणा) यास म्हाडा प्रकरणात तर राजेंद्र विनायक सोळुंके (वय 52, रा. नांदगाव, जि. नाशिक) यास टीईटी प्रकरणात अटक करण्यात आली आहे. शिक्षक पात्रता परीक्षेत गुणवाढ करण्याच्या प्रकरणात शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना पोलिसांनी आत्तापर्यंत अटक केली आहे. त्यानुसार, अधिकारी व उमेदवार यांच्यामध्ये मध्यस्थी करणाऱ्या अनेक दलालांनाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

सायबर पोलिसांकडे दाखल म्हाडा पेपर फुटीच्या प्रकरणातील गुन्ह्याचा पोलिसांकडून तपास सुरू होता. त्यावेळी पोलिसांनी यापुर्वीच अटक केलेल्या आरोपींच्या चौकशीमध्ये बुलढाणा येथील भुसारी येथील एका दलालाची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, पोलिसांच्या एका पथकाने बुलढाणा येथील भुसारी येथे जाऊन दीपक भुसारी यास अटक केली. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याने उमेदवारांची माहिती या गुन्ह्यातील आरोपी हरकळ बंधुंना दिल्याची माहिती पुढे आली. पोलिसांनी त्यास अटक करुन न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यास 24 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

2019-20 च्या टीईटी परीक्षेत उमेदवारांकडून पैसे घेऊन परीक्षेच्या निकालात फेरफार करून काही उमेदवारांना पात्र करण्यात आले होते. या प्रकरणातही पोलिसांनी आत्तापर्यंत अनेक जणांना अटक केली असून काही दलालांचा अजूनही पोलिस शोध घेत आहेत. दरम्यान, या गुन्ह्यात अटक आरोपी स्वप्नील पाटील याच्याकडे पोलिसांनी चौकशी केली. त्यावेळी नाशिक येथील राजेंद्र सोळुंके या दलालाची माहिती पोलिसांना मिळाली.

त्यानुसार, पोलिसांच्या पथकाने सोळुंके यालाही नाशिक येथे जाऊन बेड्या ठोकल्या. त्याने स्वप्नील पाटील यास काही उमेदवारांची नावे दिली होती. पोलिसांनी त्यास अटक करुन न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यास 23 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. सहाय्यक आयुक्त विजयकुमार पळसुले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक डी. एस. हाके, सहाय्यक पोलिस निरीक्षक भालेराव, कदीर देशमुख, पोलिस उपनिरीक्षक वाघमारे, सागर पडवळ, पोलिस कर्मचारी प्रवीण राजपूत, सौरभ घाटे, आदेश चलवादी यांच्या पथकाने हि कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलने जिंकलं 'दिल'! ऐतिहासिक कामगिरी अन् इंग्लंडला न पेलवणारे लक्ष्य; भारताच्या १०००+ धावा

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

लग्न न करताच ४० व्या वर्षी जुळ्या मुलांची आई होणार अभिनेत्री; म्हणाली, 'आपल्याकडे एकटी स्त्री...

Aurangabad Murder Case : काकाच्या प्रेमात पडलेल्या महिलेने ४० लाख अन् प्लॉट हडपण्यासाठी काढला पतीचा काटा!

IND vs ENG 2nd Test: इंग्लंडच्या खेळाडूने रिषभ पंतला दाखवलं 'आमिष'; आपल्या पठ्ठ्याने काय उत्तर दिले पाहा, Viral Video

SCROLL FOR NEXT