महाराष्ट्र बातम्या

मोठी घोषणा! तळीये गाव म्हाडा वसवणार - गृहनिर्माण मंत्री आव्हाड

विनायक होगाडे

मुंबई : मागील चार-पाच दिवसांपासून राज्यात पावासाने हाहा:कार माजवला आहे. रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारासह राज्यात पावसामुळे जनजीवन पूर्णत: विस्कळीत झालं आहे. चिपळूण, सांगली आणि कोल्हापूरसारख्या अनेक भागात सध्या पूरग्रस्त स्थिती आहे. रायगड जिल्ह्यातील तळीयेसारख्या ठिकाणी दरड कोसळल्यामुळे आणि इतर दुर्घटनामुळे राज्यात 80 पेक्षा जास्त जणांना जीव गमावाला लागला आहे. अनेक जण मलब्याखाली गाढले गेलेत तर शेकडो जण बेपत्ता आहेत. गाई-जनावारांसह पिकांचंही नुकसान झालेय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी दुपारी महाड येथे भेट दिली. यावेळी त्यांनी रायगड, रत्नागिरीसह राज्यातील इतर पुरग्रस्त आणि दुर्घटानग्रस्त जिल्ह्यांना मदतीची घोषणा केली आहे.

त्या पार्श्वभूमीवरच आता एक मोठी घोषणा समोर आली आहे. तळीये गाव वसवण्याची जबाबदारी म्हाडाने उचलली आहे. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची घोषणा केली आहे. याबाबतचं ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे. त्यांनी म्हटलंय की, कोकणामध्ये दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेमुळे बाधित झाले तळीये ता. महाड हे पूर्ण गाव वसविण्याची जबाबदारी म्हाडाने स्विकारली आहे. मा. मुख्यमंत्री महोदयांनी जो शब्द दिला कि कोणालाही अडचण भासू देणार नाही. ती पूर्ण करायला ही सुरुवात आहे. ही सूचना मला पवार साहेबांनी केली होती.

मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेली मदत

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाड तालुक्यातील तळोई येथील दुर्घटनाभागाची पाहणी केली. त्यानंतर गंभीर पूरस्थितीचा सामना करण्यासाठी रायगड व रत्नागिरीसाठी प्रत्येकी दोन कोटी रुपयांची तर अन्य जिल्ह्यांसाठी प्रत्येकी 50 लाख रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या दर्घटनेतील मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत व जखमींच्या उपचाराचा खर्च शासनातर्फे करण्यात येईल, असं सांगिलं आहे. ही आपत्ती कोसळलेल्या कुटुंबीयांच्या दुःखात आपण सहभागी आहोत, असेही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Citizenship: जन्मसिद्ध नागरिकत्वावर ट्रम्प यांचा डाव फसला! आदेशाला अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा ब्रेक; बर्थराइट सिटिझनशिप कायम

भाजपात अंतर्गत कुरघोडीचे राजकारण? नवनियुक्त शहराध्यक्षांच्या नियुक्तीला २४ तासांतच स्थगिती, नेमकं काय घडतंय?

Balen Shah News: नेपाळमध्ये नवा राजकीय वाद! बालेन शाहांच्या पक्षात ३५ हजार अल्पवयीन सदस्य? अडचणीत वाढ होणार

IND vs ENG 1st T20I: इंग्लंडने पहिला डाव टाकला; खचलेल्या टीम इंडियाला टक्कर देणारी प्लेइंग XI जाहीर; जोफ्रा नसला तरी...

Arabian Sea Monsoon : अरबी समुद्रात मॉन्सून तीव्र; ३ ते ६ जुलैदरम्यान मुंबई-उत्तर कोकणात अतिमुसळधार पाऊस, विदर्भातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

SCROLL FOR NEXT