Military Apshinge village gets Russian made tank! Sakal
महाराष्ट्र बातम्या

Video: युद्ध युक्रेनमध्ये पण साताऱ्यात आला रशियन बनावटीचा रणगाडा

महाराष्ट्रातील एका गावात रशियन बनावटीचा T-55 रणगाडा (Tank) दाखल झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

साताऱ्यातील मिलिटरी अपशिंगे (Apshinge Military) गाव हे सैनिकांचे गाव म्हणून देशभर ओळखलं जाते. या गावात प्रत्येक घरातील एक तरी मुलगा सैन्यात जाऊन देशसेवा करत आहे. युद्धातील स्मृती जपण्यासाठी या गावात रशियन बनावटीचा T-55 रणगाडा (Tank) दाखल झाला आहे. अशा पद्धतीने रणगाडा मिळालेलं मिलिटरी अपशिंगे हे पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव गाव आहे. त्यामुळे या गावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. (Military Apshinge village gets Russian made tank!)

महाराष्ट्रातील अनेक सुपुत्र सैन्यात जाऊन देशाची सेवा बजावत आहेत. मात्र सातारा जिल्ह्यातून सैन्यदलात सेवा बजावणाऱ्या तरुणांची संख्या लक्षणीय आहे. सातारा जिल्ह्यातील 'मिलिटरी अपशिंगे' गाव सैनिकांचं गाव (Village of Soldiers) म्हणून ओळखलं जातं. या गावातील वीर सुपुत्रांचं सैन्यदलातील योगदान लक्षात घेऊन या गावाला रणगाडा भेट देण्यात यावा, अशी मागणी अनेक दिवसांपासून करत आहेत. माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी पुणे येथील दक्षिण मुख्यालयाच्या लष्करी केंद्राकडे त्यासाठी मागणी केली होती. अपशिंगे (मिलिटरी) गावाने त्यासाठी लागणाऱ्या सर्व कागदपत्रांची पुर्तता केली होती. सत्ताबदलानंतर साताऱ्याचे विद्यमान पालकमंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब पाटील यांनी जिल्हा सैनिक कल्याण केंद्राच्या माध्यमातून पुन्हा सातत्याने पाठपुरावा केला.

अनेक दिवसांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नानंतर गावकऱ्यांना यश आलं. मिलिटरी अपशिंगे गावाच्या सुपुत्रांच्या योगदानाचा आदर ठेऊन रशियन बनावटीचा T55 रणगाडा गावाला देण्यात आला. 2 मार्च रोजी विशेष लष्करी वाहनाने हा रणगाडा अपशिंगे गावात आणला गेला. या रणगाड्याच्या स्वागतासाठी गावातील आणि भागातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते. T55 रणगाड्याची अपशिंगे गावात वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. लोक उत्साहाने त्यात सामील झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Fraud News : बेरोजगारांच्या फसवणुकीचे मायाजाल! नोकरीचे आमिष दाखवून तरुण- तरुणींना लाखोंना गंडा

Latest Maharashtra News Updates : आमदार हेमंत पाटील यांच्या वक्तव्याविरोधात वंचित बहुजन आघाडीने केला निषेध

Viral Video: लहानपणीची गोष्ट खरी ठरली! ससा अन् कासवाची लावली स्पर्धा; ससा का हरतो? खरं कारण आलं समोर

Nashik News : सहकार वर्षानिमित्त मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शिखर समितीची महत्त्वपूर्ण बैठक

Hadsar Fort: हडसर गडावर सापडला इतिहासाचा अमूल्य ठेवा; गड संवर्धन मोहिमेत मिळाला फारसी शिलालेख

SCROLL FOR NEXT