Asaduddin Owaisi esakal
महाराष्ट्र बातम्या

Jaipur Mumbai Express Firing : ''हा दहशतवादी हल्ला'', जयपूर एक्स्प्रेसमधील फायरिंगवरुन ओवैसींची भाजपवर टीका

संतोष कानडे

Jaipur-Mumbai Exp Firing : जयपूर-मुंबई एक्प्रेसमध्ये आज पहाटे थरारक घटना घडली. हवालदार चेतन सिंहने गोळीबार करत चौघा जणांचा जीव घेतला. मृतांमध्ये तीन प्रवाशी आणि एका सहाय्यक उपनिरीक्षकाचा समावेश आहे. ही घटना वापी आणि पालघरदरम्यान पहाटे साडेपाच वाजण्याच्या दरम्यान घडली.

पहाटे घटडेल्या या थरारक घटनेची सविस्तर माहिती रेल्वे पोलिस आयुक्तांनी पत्रकार परिषदेद्वारे दिली आहे. जीआरपीचे आयुक्त रविंद्र शिसवे म्हणाले की, जयपूरहून मुंबईकडे येणाऱ्या जयपूर सुपरफास्ट एक्स्प्रेसने वापी स्टेशन सोडल्यानंतर ट्रेनमधील कॉन्स्टेबल चेतन सिंग याने एएसआय टिकाराम मीना आणि बोगीमधल्या तीन लोकांवर फायरिंग केलं. यातच त्यांचा मृत्यू झाला. घटनेमागचं नेमकं कारण अद्याप पोलिसांनी सांगितलेलं नाही.

चार लोकांचा जीव घेतल्यानंतर चेतन सिंह ट्रेनमध्ये इतर लोकांना कथितपणे धमकावत असतानाचा एक व्हीडिओ व्हायरल झाला आहे. यात तो म्हणतोय, “अगर वोट देना है, हिंदुस्थान में रहना है तो मोदी और योगी को दो, और आपके ठाकरे…” याच्यापुढे तो काय बोलला ते लक्षात येत नाही.

या घटनेबद्दल प्रतिक्रिया देतांना एमआयएमचे प्रमुख, खासदार असदुद्दी ओवैसी म्हणाले की, हा एक दहशतवादी हल्ला आहे. या घटनेत मुस्लिमांना लक्ष केल्याचं दिसून येतंय. नरेंद्र मोदी हे नेहमी मुस्लिमविरोधी, चिथावणीखोर भाषणं देतात, त्याचा हा परिणाम आहे. आरोपी भाजपचा भावी उमेदवार होईल का? त्याच्या जामिनाला सरकारचा पाठिंबा असेल का? तो सुटल्यावर त्याला हार घातले जातील का? हे सगळं चुकीचं ठरलं तर मला आनंद होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी! , सरकारने 'त्या' महिलांना योजनेचा लाभ देणे केले बंद

Shubman Gill Video: इंग्लंडच्या गोलंदाजाने केला गिलचा फोकस हलवण्याचा प्रयत्न; मग भारताच्या कर्णधारानं काय केलं पाहाच...

Shiv Yog 2025: उद्या शिवयोगाचा दुर्मिळ योग, धनु राशीसह 5 राशींवर माता लक्ष्मीची राहील कृपादृष्टी

BPSC Clerk Recruitment: 12वी पास तरुणांसाठी सुवर्णसंधी! BPSC मार्फत क्लार्क पदासाठी भरती जाहीर; जाणून घ्या पगार किती मिळेल?

निलेश साबळे 'चला हवा येऊ द्या २' मध्ये का दिसणार नाही? खरं कारण समोर, म्हणाला, 'गेले सहा महिने...

SCROLL FOR NEXT