mimes from the political quake, netizens entertain all day mimes from the political quake, netizens entertain all day
महाराष्ट्र बातम्या

भन्नाट मिम्स : मी पुन्हा येईल, हा चेष्टेचा नाही तर भीतीचा विषय

राजेश प्रायकर

नागपूर : राज्यात पहाटेच्या खेळीनंतर सोमवारी रात्रीच्या सूरत वारीवरून राज्याच्या राजकारणाला वेगळीच कलाटणी मिळाली आहे. महाविकास आघाडी सरकार शेवटच्या घटका मोजत आहे? परंतु, राज्यातील या ‘हायवोल्टेज ड्रामा-२’मुळे व्हॉटस्‌अप, फेसबुक, ट्विटरवरील भन्नाट मिम्सने नेटकऱ्यांचे चांगलेच मनोरंजन केले. ‘माझा एकनाथ तुझ्यात, तुझा एकनाथ माझ्यात, ओम फट्‍ स्वाहा’, ‘कसला आतल्या गाठीचा आहे रे तू’, असे चित्रपटातील डॉयलॉग्सचा वापर करून तयार करण्यात आलेल्या मिम्सने अक्षरशः हास्याचे फवारे उडविले. (mimes from the political quake, netizens entertain all day)

मंगळवारची सकाळच अनेकांसाठी धक्कादायक ठरली. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व महाविकास आघाडीतील क्रमांक दोनचे मंत्री एकनाथ शिंदे गुजरातमधील सुरतेत आमदार घेऊन गेल्याची बातमी प्रत्येकाचे कानावर पडली अन् सारेच आश्चर्यात पडले. परंतु, सकाळचे गंभीर वातावरण दुपारपर्यंत नेटकऱ्यांची करमणुकीचे साधन ठरले.

महाविकास आघाडी सरकारचे काय होईल ते होईल. परंतु, सायंकाळपर्यंत अनेक मिम्सने हास्याची करंजी उडविली. फेसबुक, व्हॉटस्‌अप, ट्विटर या सोशल मिडियावर भन्नाट मिम्स्‌, टिका-टिप्पणीपासून विनोद करण्यात आले. शिंदे यांच्या ट्विटररील मेसेजनंतर ‘शिंदे साहेब, उद्धव साहेब यांच्यानंतर तुम्हीच मुख्यमंत्री होणार होता, कमलीच्या नादाला लागू नका’ असे भन्नाट पण विचार करायला लावणारे ट्विट एका शिवसैनिकाने केले.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे यांच्या एकत्रित छायाचित्रावर ‘हे बघा साहेब एअरप्लेन मोडवर टाकला मोबाईल’, एकनाथ शिंदे यांनीच पुरस्कृत केलेल्या ‘धर्मवीर’ चित्रपटातील ‘एकनाथ कुठाय’ या डॉयलॉगने चांगलेच रंजन केले. ‘पुणे मुंबई पुणे’ चित्रपटातील ‘कसला आतल्या गाठीचा आहेस रे तू’ यांनी नेटकऱ्यांचे चांगलेच मनोरंजन केले.

‘दूध आणि चहा पावडर जास्त आणून ठेवा, राज्यपाल यांच्या स्टाफला सूचना' या नर्मविनोदी शैलीतील मिम्सने अक्षरशः हास्यकारंजी उडविली. ‘गद्दारांना क्षमा नाही’, ‘ज्या सूरतेची लूट मराठ्यांनी केली, त्याच सुरतेत तुम्ही सत्तेसाठी शरण गेलात’, ‘आत्ता बंडाळी का? तीन वर्षे सत्तेत गाजर खात होतात का’, अशा ओळीतून अनेकांनी शिंदे यांच्यावर संतापही व्यक्त केला.

‘मी पुन्हा येईल’ भीतीचा विषय

विधानसभा निवडणुकीच्या सभांमध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा ‘मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल’ हा डायलॉग चांगलाच प्रसिद्ध झाला होता. त्यावेळीही यावर अनेक मिम्स तयार झाले. आजही काहींनी ‘मी पुन्हा येईल, हा चेष्टेचा विषय केला होता, आता तो भीतीचा विषय झाला’ असे मिम्स तयार करीत महाविकास आघाडीतील नेत्यांना टोला लगावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

El Nino Impact on Rabi Crops : एल निनोचा विळखा! रब्बी हंगामात अन्नधान्य उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता; कृषी सचिवांनी व्यक्त केली चिंता

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापुरात बिबट्याची दहशत! थेट फुलेवाडी-लक्षतीर्थ मार्गावर झेप घेत उसाच्या शेतात शिरला, मानवी वस्तीत भीतीचं वातावरण; वन विभाग-पोलिस यंत्रणा सतर्क

IIT Bombay Case: कॉपी केल्याचा साहिलला पश्चात्ताप, मित्र-मैत्रिणीला फोन केल्याचे पोलिस तपासात उघड

Marathi News Live Updates: अनंत चतुर्दशीच्या विसर्जन मिरवणुकीतील गर्दीचा चोरट्यांनी घेतला फायदा; लालबागचा राजा, परळ आणि गिरगाव चौपाटी परिसरात चोरीच्या घटनांनी पोलिसांची डोकेदुखी वाढली

ढिंग टांग : आत्ता होता, गेला कुठे..?

SCROLL FOR NEXT