thorat pawar e sakal
महाराष्ट्र बातम्या

टीका करण्यापेक्षा काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र या; थोरातांचे शरद पवारांना उत्तर

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : काँग्रेसची अवस्था उत्तरप्रदेशातील जमिनदारासारखी झाली आहे, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केले होते. त्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटताना दिसल्या. आता काँग्रेसचे मंत्री बाळासाहेब थोरात (congress minister Balasaheb Thorat) यांनी देखील शरद पवारांच्या टीकेला उत्तर दिले आहे.

शरद पवारांच्या विधानाशी असहमत आहे. काँग्रेसने कधीही जमीनदारी केली नाही. काँग्रेसचे विचार पुरोगामी विचार आहेत. पण, आता याच तत्वाला कठीण दिवस आले आहेत. माणसांत आणि समाजात भेट निर्माण केले जात आहेत. आपण एका विचाराचे आहोत. पवारांनी टीका-टीप्पणी करण्यापेक्षा काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र यायला हवं. युपीए म्हणून एकत्र होतो आणि सहकारी म्हणूनही एकत्र होतो. युपीएचा कारभार चांगला होता, असे बाळासाहेब थोरात म्हणाले.

किरीट सोमय्यांचे वक्तव्य आणि ईडीच्या कारवाईवरही त्यांनी भाष्य केले. सोमय्या बोलतात आणि ईडी वागते, असंच लोकांना वाटतं. तपास यंत्रणा आता राजकारणासाठी होतो हे कळून चुकलं आहे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

शरद पवार नेमके काय म्हणाले होते?

सन २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या विरोधकांसाठी पंतप्रधानपदाच्या उमेदवार होऊ शकतात, असं काँग्रेस नेत्यांना सूचवल्यावर ते म्हणतात, ममता बॅनर्जीच का? आमच्याकडे राहुल गांधी आहेत, अशी त्यांची भूमिका असते" असा मुद्दा मुलाखत घेणाऱ्या संपादकांनी मांडला. त्यावर शरद पवार म्हणाले, "यापूर्वीही एकदा मी एक गोष्ट सांगितली होती. उत्तर प्रदेशमध्ये जमीनदार होते, त्यांची मोठी शेती असते. गावात त्यांची मोठी हवेली देखील असते. लँड सीलिंगचा कायदा आला त्यात त्यांच्या मोठ्या शेतजमिनी गेल्या. अनेक लोकांमध्ये त्या वाटल्या गेल्या. पण त्यांची हवेली तशीच आहे गावात. या हवेलीची दुरुस्ती करण्याचीही आता त्यांच्यात ताकद राहिली नाही. त्यांच्या शेतीचं उत्पन्न पहिल्यासारखं राहिलं नाही. त्यांच्याकडे आधी काही हजार एकर जमीन होती, ती आता पंधरा-वीस एकर राहिली. पण सकाळी जेव्हा हा जमिनदार आपल्या हवेलीतून बाहेर पाहतो आणि आजूबाजूला पाहून हे सर्व माझं होतं. माझं होतं पण आता नाहीए ना! अशी अवस्था काँग्रेस नेत्यांची झाली."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'पोलिसात न्या, तिथं बघतोच तुम्हाला, माझा बाप...' मनसे नेत्याच्या लेकाची इन्फ्लुएन्सरला शिवीगाळ, अर्धनग्नावस्थेतला VIDEO VIRAL

Pune News: शिक्षकांचे आंदोलन सुरू, पण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही,शाळा ८, ९ जुलैला बंद राहणार नाहीत, शिक्षण विभाग

Sangli Muharram: 'हिंदू-मुस्लिम ऐक्याची दीडशे वर्षांची परंपरा'; गगनचुंबी ताबुतांच्या कडेगावात गळाभेटी

Viral Video: अप्पाचा विषय लय हार्डय ! जीम ट्रेनर समोर आजोबांनी मारले जोर पण टोपी पडली नाही... पाहा अनोख्या कौशल्याचा व्हिडिओ

'ही प्राडाची नाही... ओरिजनल कोल्हापुरी आहे'; Prada ला टोला लगावत अभिनेत्री करिना कपूर 'कोल्हापुरी चप्पल'बाबत काय म्हणाली?

SCROLL FOR NEXT