Deepak Kesarkar esakal
महाराष्ट्र बातम्या

Deepak Kesarkar : 'शाळा बंद केल्या, खासगी कंपन्यांना चालवण्यास दिल्या अशा अफवा पसरवणाऱ्यांची चौकशी करणार'

शाळा बंद केल्याची अफवा पसरवणाऱ्यांची चौकशी करणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

राज्यात लवकरच मोठी शिक्षक भरती (Teacher Recruitment) केली जाणार आहे.

सांगली : राज्यातील काही शाळा (Government School) आम्ही बंद केल्या, काही खासगी कंपन्यांना चालविण्यास दिल्या अशा अफवा पसरवणाऱ्यांची चौकशी करून कारवाई करू, असा इशारा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी आज दिला.

शिक्षकांनी गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले पाहिजे, याची जाणीव ठेवा. सर्व शिक्षक संघटनांची बैठक लवकरच घेतली जाईल, असेही त्यांनी सांगितले. सावरकर प्रतिष्ठानतर्फे आयोजित कार्यक्रमासाठी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आज सांगलीत आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

केसरकर म्हणाले, ‘शिक्षकांचे काम शिक्षण देणे हे आहे. त्यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले पाहिजे. आम्ही एकही शाळा बंद केली नसताना शाळा बंद केली म्हणून कोणी संगितले? आपण मुलांना शिक्षण देण्यासाठी बांधिल आहोत की नाही याबाबत राज्यातील शिक्षक संघटनांची बैठक घेणार आहे.

राज्यात पहिल्यांदाच काम करणारे सरकार आले आहे. त्याठिकाणी अशा अफवा पसरवून गैरसमज निर्माण करणे योग्य नाही. शाळा बंद करण्यासाठी आम्ही शिक्षक भरती करत नसून, दर्जेदार शिक्षणासाठी हा निर्णय घ्यावा लागेल. शाळा बंद केल्याची अफवा पसरवणाऱ्यांची चौकशी करणार आहे. तरच शिक्षण सुधारेल. राज्यात लवकरच मोठी शिक्षक भरती (Teacher Recruitment) केली जाणार आहे.

मात्र, काही लोक न्यायालयात जाऊन या भरतीला स्थगिती घेत आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये खुल्या प्रवर्गातून बदली शिक्षकांची नियुक्ती केल्याची बाब आमच्या निदर्शनास आली. यातून ३०० ते ४०० जागा निघाल्या. त्याबाबत निर्णय घेतल्याने शिक्षक भरती प्रक्रियेला उशीर झाला आहे. मात्र, लवकरच शिक्षक भरती केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

ठाकरेंना हिंदू धर्माबद्दल काही राहिले नाही

शिवसेना बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केली. शिवसेनेत ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण होत असे. मात्र सध्या केवळ १०० टक्के राजकारण होत आहे. त्यांना दुसरे काही येतच नाही. रोज मत व्यक्त करायचे. सर्व काही ठाकरे गटच ठरवत असते. अध्यक्षांनी काय निर्णय घ्यावा हेच सांगत असतात. उच्च न्यायालयाने काय निर्णय घ्यायचा, ते पण हेच बोलतात.

आता ठाकरे गटाने स्वतःसाठी घटना दुरुस्ती करून पद निर्माण करून घ्यावे. लोकांनी यांचे बोलणे ऐकून घ्यायचे का? ठाकरे गटात कोण राहिले आहेत? असे लोक आहेत ठाकरे गटात ज्यांना देशाबद्दल, हिंदू धर्माबद्दल काही राहिले नाही, अशी टीका श्री. केसरकर यांनी यावेळी केली.

शिवसेनेत ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण होत असे. मात्र सध्या केवळ १०० टक्के राजकारण होत आहे. त्यांना दुसरे काही येतच नाही. ज्यांना देशाबद्दल, हिंदू धर्माबद्दल काही राहिले नाही, असे लोक आता ठाकरे गटात आहेत.

- दीपक केसरकर, शालेय शिक्षण मंत्री

मराठा आरक्षणासाठी सरकार सकारात्मक

दीपक केसरकर म्हणाले, ‘शासन मराठा आरक्षणासाठी सकारात्मक आहे. ईडब्ल्यूएसच्या माध्यमातून मराठा समाजातील मुलांना न्याय देण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. मराठा समाजाच्या हिताचे निर्णय आमचे सरकार घेत आहे. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देण्याच्या मागणीसाठी सरकार सकारात्मक आहे.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: प्रशिक्षक रिकी पाँटिंगनेच दिलेला वर्चस्व गाजविण्याचा सल्ला, कुपर कोनोलीनं स्पष्टच केला खुलासा

अल्लू अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांनी राबवला अनोखा उपक्रम ! मुलींसाठी HPV लसीकरण मोहिमेची सुरुवात

Viral status Thackeray group : ‘उद्धवरावांची उद्‌ध्वस्त सेना’ ठाकरेंच्या प्रमुख नेत्याच्या स्टेटसने चर्चा, ५ मिनीटात डिलीटही केलं

Akola News: शहरातील ३५ पाण्याच्या टाक्यांची होणार दुरुस्ती; चार झोनमध्ये पाणीपुरवठा व्यवस्थापनाचे नियोजन

Nanded Crime: माहूर तालुक्यातील बंद खडी केंद्रावरील गिट्टी साठा बेकायदेशीर; एक कोटी ९९ लाखाचा दंड, तहसीलदारांची कारवाई!

SCROLL FOR NEXT