Union Minister Narayan Rane esakal
महाराष्ट्र बातम्या

नितेश कलाकार बनतोय याचं समाधान, त्यानं मांजराचा आवाज काढला - राणे

सकाळ डिजिटल टीम

हिवाळी अधिवेशनात नितेश राणे यांनी म्याँव-म्याँव, असा आवाज काढून आदित्य ठाकरेंची खिल्ली उडविली होती.

मुंबई : भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Union Minister Narayan Rane) यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. सध्या शिवसेना आणि भाजप (Shiv Sena vs BJP) नेत्यांकडून एकमेकांवर सुरू असलेले आरोप-प्रत्यारोप, तसेच बीएमसीकडून (BMC) त्यांच्या बंगल्याच्या तपासणीसाठी आलेल्या नोटीसवर नारायण राणेंनी भाष्य केलं. यावेळी त्यांनी आमदार नितेश राणेंच्या (Nitesh Rane) कलाकारीचं देखील तोंडभरुन कौतुक केलं.

पत्रकार परिषदेत नारायण राणेंनी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) व आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावरही निशाणा साधलाय. ते म्हणाले, नितेशवर एक कारवाई म्याँव-म्याँवची आहे. म्याँव-म्याँव कोण आहे हे माहीत नाही. वाघ जाऊन मांजरं कशी आली हे मला कळलं नाही. स्वत:ला वाघ बोलणारे मांजर कसे झाले हे समजलं नाही. स्वत:ला वाघ म्हणणारे मांजरीच्या आवाजानं.. का असं झालं कळलं नाही. नितेश एक कलाकार बनतोय याचं समाधान आहे. मांजरीचा आवाज काढलाय त्यानं, त्याच्यातला कलावंत उमगला, असं सांगत राणेंनी नितेश यांचं कौतुक केलंय.

हिवाळी अधिवेशनात (Winter Session) नितेश राणे यांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर भाजपचे आंदोलन (BJP) सुरु असताना आदित्य ठाकरे यांना डिवचलं होतं. हे आंदोलन सुरु असताना आदित्य ठाकरे विधिमंडळात प्रवेश करत होते. त्यावेळी नितेश राणे यांनी म्याँव-म्याँव, असा आवाज काढून आदित्य ठाकरे यांची खिल्ली उडविली होती. विशेष म्हणजे, नितेश राणे यांनी प्रसारमाध्यमांसमोर जाहीरपणे आपल्या या कृतीचं समर्थनही केलं होतं. त्यानंतर महाविकासआघाडी सरकारकडून नितेश राणे यांच्याविरुद्ध पद्धतशीरपणे चक्रे फिरायला सुरुवात झाली होती. सुरुवातीला महाविकासआघाडीच्या नेत्यांनी आदित्य ठाकरे यांची खिल्ली उडवल्याप्रकरणी नितेश राणे यांच्या निलंबनाची मागणी लावून धरली. तर दुसरीकडं कणकवली पोलिसांनी (Kankavli Police) संतोष परब प्रकरणात (Santosh Parab Case) चौकशीचा फास आवळायला सुरुवात केली. पोलिसांनी पद्धतशीरपणे व्यूहरचना करत नितेश राणे यांच्याविरोधात पुरावे गोळा करुन त्यांची कोंडी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NHAI-Jio safety alert system: ‘हायवे’वरील धोक्यांचा इशारा आता मोबाइलवर आधीच कळणार ; 'NHAI-Jio' मध्ये करार!

मैदानी चाचणी फेब्रुवारीपासून! पोलिस भरतीत एका पदासाठी ८३ उमेदवार; इच्छुकांना रविवारपर्यंत करता येईल अर्ज; १५,६३१ पदांची भरती

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत सरकारचं मोठं विधान; कर्मचाऱ्यांची 'ही' मागणी फेटाळून लावली

Pune Voter List : मतदार यादीवर हरकत नोंदविण्यासाठी आज शेवटचा दिवस; हरकतींची संख्या १२ हजाराच्या वर!

Ahilyanagar Leopard Attack : बिबट्याच्या अचानक हल्ल्याने भागूबाई खोडदे यांचा बळी; पारनेर तालुक्यात भीतीचं वातावरण!

SCROLL FOR NEXT