Chhagan Bhujbal esakal
महाराष्ट्र बातम्या

छगन भुजबळ यांची 100 कोटींची मालमत्ता जप्त?

सकाळ वृत्तसेवा

ठाकरे सरकारचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांची मालमत्ता जप्त करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे

मुंबई- ठाकरे सरकारचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांची मालमत्ता जप्त करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्विट करुन याची माहिती दिली आहे. छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ आणि माजी आमदार पंकज भुजबळ यांच्या 100 कोटींच्या बेनामी मालमत्ता BENAMI Properties आयकर विभागाने जप्त केल्या, असं सोमय्या म्हणाले आहे. असे असले तरी आयकर विभागाने जप्त केलेल्या संपत्तीशी माझा संबंध नाही, असं छगन भुजबळ म्हणाले आहेत. (Maharashtra Latest News)

किरीट सोमय्या यांनी दिलेल्या माहितीनुसार, आयकर विभागाने मरीनड्राइव्हच्या अल-जबेरिया कोर्ट ही इमारत बेहिशोबी मालमत्ता म्हणून सील केली आहे. या इमारतीची बाजार भावानुसार किंमत १०० कोटी आहे. ज्या कंपनीने या इमारतीची खरेदी केली होती. चौकशीत या कंपनीकडे इमारत खरेदी करण्याच्या अनुशंगानेन पुरेसे पैसेही नव्हते. या इमारतीची राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्याविरूद्ध मनी लाँडरिंग प्रकणात ईडीने चौकशीही केली होती. ईडीला महाराष्ट्र सदन घोटाळ्यातील पैसे या इमारतीच्या खरेदीसाठी वापरला असल्याचा संशय होता.या प्रकरणी व्यावसायिक अर्शद सिद्धीकी याच्या मार्फत हे पैसे गुंतवल्याचा संशय ईडीला होता. त्यानुसार ईडीने त्याचा जबाबही नोंदवला होता.

सिद्धीकी व भुजबळांचा पुतण्या समीर हे डिसेंबर २०१३ मध्ये कुवेतला गेले होते. कुवेतमध्ये त्यांनी त्या इमारतीचा हक्क असलेल्या राजघराण्यातील व्यक्तींची भेट घेऊन करारावर चर्चा केली होती. असे पुरावे ईडीला मिळाले होते. राजघराण्याने अल-जबरिया कोर्ट या इमारतीचा सर्वात वरचा मजला स्वत:साठी ठेवला होता. तर इमारतीतले इतर फ्लॅट भाड्याने दिले होते, असंही सोमय्या म्हणाले आहेत. दरम्यान, आयकर विभागाने जप्त केलेल्या संपत्तीशी माझा संबंध नाही, असं छगन भुजबळ म्हणाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हे पुतळे नव्हेत तर स्मरण, भिडे गुरुजींसारखे गुरुजी छत्रपतींचा इतिहास तरुणांमध्ये रुजवतायत : मुख्यमंत्री फडणवीस

Kolhapur Rising addiction : फॅशनपासून व्यसनापर्यंतचा प्रवास: महाविद्यालयीन विद्यार्थिनी ‘स्मोकिंग-दारू’च्या विळख्यात, पालक हतबल

Latest Marathi News Live Update : जुन्नरमध्ये बिबट्याचा हल्ला; ८ वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू

लिओनेल मेस्सी पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणार नाही; समोर आलं मोठं कारण...

Mobile Expire Alert: तुमचा मोबाईलही एक्स्पायर होतो? 90% लोकांना 'हे' माहितीच नाही

SCROLL FOR NEXT