Sanjay Rathod Sakal
महाराष्ट्र बातम्या

जो कुणी माझी बदनामी करेल त्याला कायदेशीर उत्तर देणार - संजय राठोड

दत्ता लवांडे

नागपूर : राज्यातील नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर मंत्री संजय राठोड पहिल्यांदाच आपल्या मतदारसंघात पोहोचले आहेत. यावेळी त्यांचे नागपूरात जंगी स्वागत करण्यात आले असून त्यांच्यावरील आरोपावर बोलताना त्यांनी टीका करणाऱ्याला चांगलंच फटकारलं आहे.

(Sanjay Rathod News)

दरम्यान, तुमच्यावर आरोप असतानाही तुम्हाला परत मंत्रिपद मिळालं यावर बोलताना ते म्हणाले की, "माझ्यावर आरोप होते त्यावर मी निष्पक्षपणे राजीनामा दिला, त्यावर पोलीस चौकशी झाली, कारवाई झाली पण न्यायालयाने माझ्याबद्दल आता निकाल दिला आहे. यानंतर या संदर्भात जो कुणी माझी बदनामी करेल त्याला मी कायदेशीर उत्तर देणार आहे." असं संजय राठोड बोलताना म्हणाले आहेत.

उद्धव ठाकरेंबद्दल जे ट्वीट संजय शिरसाठ यांच्याकडून पडलं होतं, ते चुकून पडलं असल्याचं स्पष्टीकरण देत उद्धव ठाकरेंबद्दल आम्हाला आदर आहे असं संजय राठोड म्हणाले आहेत. खातेपाटप आणि जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदी निवड लवकरच करण्यात येणार आहे, त्याचबरोबर कुणाला कोणतं मंत्रिपद दिलं जाईल ते मुख्यमंत्री ठरवतील असं त्यांनी सांगितलं.

मतदारसंघात पावसामुळे जे काही नुकसान झाली आहे त्याचा मी आढावा घेणार आहे. दरम्यान नुकसानीची आकडेवारी पुढे आली की लगेच मदतीला सुरूवात केली जाणार आहे. शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून हे सरकार काम करत आहे. महाराष्ट्रातील शेतकरी, कामगार, मजूर अशा सर्वांसाठी सरकारला काम करायचं असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

आज मी मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा माझ्या मतदारसंघात जाणार असून सुरूवातीला पोहरादेवीच्या दर्शनाला जाणार आहे. त्यानंतर माझ्या जिल्ह्यात फिरणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. दरम्यान माझ्यावर जे आरोप होते त्यासंदर्भात आता जे कोण परत आरोप करेल त्याला मी कायदेशीर उत्तर देईल असं ते म्हणाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India WTC Final Scenario: टीम इंडिया फायनलमध्ये जाणार की नाही? ICC ने सोपं गणित मांडून गुंता सोडवला की वाढवला?

Jalgaon Gold And Silver Price : खिसा रिकामा होणार! डिसेंबरच्या २१ दिवसांतच सोने ५५०० रुपयांनी तर चांदी २७ हजारांनी महागली

Viral Video: इथं कधीही फोटो काढू नका… क्षणात गिळंकृत करणारा पृथ्वीवरील जीवघेणा स्पॉट, इथं उभं राहणंही धोकादायक

Latest Marathi News Live Update : ग्रँड रोडवरील भाटिया रुग्णालयात अंडरग्राउंड भागात आग लागली; रुग्ण सुरक्षित स्थलांतरित

Kolhapur Muncipal : चार सदस्यीय प्रभागात प्रथमच नवे मतदान तंत्र; रंगनिहाय उमेदवारांची नावे मतदान यंत्रावर

SCROLL FOR NEXT