Sharad Pawar vs Som Prakash esakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar : आगामी लोकसभेपर्यंत शरद पवारांचा प्रभाव कमी होणार; केंद्रीय मंत्र्याचं मोठं विधान

'भाजपला 2024 मध्ये केंद्रात पुन्हा सत्ता आणण्यासाठी आमची रणनीती ठरली आहे.'

सकाळ डिजिटल टीम

'भाजपला 2024 मध्ये केंद्रात पुन्हा सत्ता आणण्यासाठी आमची रणनीती ठरली आहे.'

सातारा : देशात काँग्रेस पक्षच तुटत चालल्याने त्याचे गडही तुटू लागलेत. आगामी निवडणुकीपर्यंत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांचा सातारा लोकसभा मतदारसंघातील प्रभाव कमी होऊन भाजपची (BJP) ताकद आणखी वाढलेली दिसेल, असा विश्वास केंद्रीय उद्योग व वाणिज्य राज्यमंत्री सोम प्रकाश (Som Prakash) यांनी येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केला. या वेळी त्यांनी काँग्रेसवरही निशाणा साधला.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election) भाजपने काही मतदारसंघांवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यामध्ये सातारा लोकसभा मतदारसंघाचा समावेश असून, आढावा घेण्यासाठी माझा दौरा आहे. भाजपला २०२४ मध्ये केंद्रात पुन्हा सत्ता आणण्यासाठी आमची रणनीती ठरली आहे. त्यासाठी लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्ते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, उद्योजक, व्यावसायिक यांच्याशी आम्ही चर्चा करून केंद्राच्या योजना, कर्ज योजनांचा लाभ मिळतोय का याचा आढावा घेत आहोत, अशी माहिती प्रकाश यांनी दिली.

सोम प्रकाश पुढं म्हणाले, ‘‘भाजपच्या कार्यकर्त्यांनी लोकांच्या मनातील काम केले पाहिजे, तसेच कामांच्या माध्यमातून त्यांच्या मनात स्थान निर्माण केले पाहिजे. त्यातून मते मिळणार आहेत. नरेंद्र मोदी हे देशातच नव्हे, तर जगातील प्रभावशाली नेते बनले आहेत.’’ काँग्रेस पक्षच तुटत चालला असून, गडाचे काय घेऊन बसलात. महाराष्ट्रात, तसेच सातारा जिल्ह्यात शरद पवार यांचा प्रभाव आहे. त्यामुळे तुम्ही कोणती रणनीती अजमावणार यावर सोम प्रकाश म्हणाले, ‘‘आगामी निवडणुकीपर्यंत शरद पवार यांचा प्रभाव कमी होईल, तसेच भाजपची ताकद वाढत जाईल. त्याचा आम्हाला निवडणुकीत फायदा होईल.’’

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने काही मतदारसंघांवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यात सातारा लोकसभेचा समावेश असून, या लोकसभेचा उमेदवार ज्या- त्या वेळी ठरविला जाईल.

- सोम प्रकाश, केंद्रीय उद्योग व वाणिज्य राज्यमंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Coastal Road Closed : मुंबई कोस्टल रोड उद्या ५ तास बंद... कसे असतील पर्यायी मार्ग, प्रवास करण्यापूर्वी नक्की वाचा

Nitin Gadkari : अक्कलकोट विधानसभेच्या आणखी दोन महत्त्वाच्या कामाला मंजुरी देण्याची गडकरींची घोषणा; विकास कामात राजकारण न करण्याचे केले आवाहन

Pune News : पेशवेकालीन भूमिगत जलवाहिनी जीर्णोद्धारास स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी

CGHS नियमांमध्ये मोठा बदल! आता आई-वडील किंवा सासू-सासरे यांच्यापैकी एकालाच मेडिकल लाभ मिळणार; नवा नियम लागू

PBKS vs MI Live : शार्दूल ठाकूरची 'स्टम्प' तोड गोलंदाजी! पंजाबने ३३ धावांत गमावले ६ फलंदाज; 'लॉर्ड'च्या ४ विकेट्सने फिरली मॅच Video

SCROLL FOR NEXT