PM Modi File photo
महाराष्ट्र बातम्या

'मोदीजी, जाहीरातींचे शूट अन् भाषणांमधून वेळ मिळाला तर हे काम करा'

भाग्यश्री राऊत

नागपूर : कोविशिल्ड लस (covishield vaccine) घेतलेल्यांना युरोपमध्ये प्रवेश करता येणार नाही, असा निर्णय युरोपियन युनियनने घेतला आहे. त्यामुळे भारतातील कोविशिल्ड घेतलेल्या व्यक्तींना युरोपियन देशांमध्ये जाण्याचे मार्गच बंद झाले आहेत. त्यानंतर सिरम इन्स्टीट्युटचे सीईओ अदर पुनावाला यांनी ही समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे म्हटले आहे. त्यावरूनच आता महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. (minister yashomati thakur criticized pm modi on covishield issue)

सध्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जाहीरातींचे शूट आणि भाषणांमध्ये व्यस्त दिसतात. त्यांनी आपल्या या व्यस्त टाइमटेबलमधून वेळ काढावा आणि कोविशिल्डला युरोपियन युनियनमध्ये मंजुरी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा, असे यशोमती ठाकूर म्हणाल्या.

नेमकं काय आहे प्रकरण?

कोरोनावर मात करण्यासाठी सध्या जगात लसीकरणावर भर दिला जात आहे. भारतातही कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सीन अशा दोन लशींचे लसीकरण सुरू आहे. कोव्हॅक्सीनला जागतिक आरोग्य संघटनेने मंजुरी दिलेली नाही. पण, ती काही दिवसात मिळेल, असे कंपनीकडून सांगण्यात येत आहे. मात्र, कोविशिल्ड ही अॅस्ट्राझेनेकाची लस आहे. तिला विदेशात परवानगी आहे. पण, युरोपियन युनियनने कोविशिल्ड लस घेतलेल्यांना प्रवेश न देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भारतीयांसाठी मोठे संकट उभे राहिले आहे.

काय म्हणाले पुनावला?

“मला जाणीव आहे की, कोविशिल्ड लस घेतलेल्या असंख्य भारतीयांना युरोपियन देशात जाण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. मी सर्वांना शब्द देतो की, हा मुद्दा मी उच्च स्तरावर मांडला आहे. आशा आहे की, हा मुद्दा लवकरच निकाली निघेल,” असं ट्विट पुनावाला यांनी केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Santosh Deshmukh Case: ''आरोपींच्या विरोधात शब्दही न बोलणारे लोकप्रतिनिधी...'', धनंजय देशमुखांचा मुंडेंवर घणाघात

माधुरीचं 'हे' गाणं अश्लिल म्हणत कोर्टाने केलेलं बॅन, दूरदर्शन, रेडिओवर सुद्धा गाणं वाजवण्यास होती बंदी

Latest Marathi News Live Update : अहिल्यानगर लाठीचार्ज प्रकरण 30 अटकेत असलेल्या सर्व आरोपीना मिळाला जामीन

Kojagiri Pournima : किल्ले रायगड आजही विसरू शकणार नाही कोजागिरीशी जोडला गेलेला शिवाजी महाराजांचा इतिहास, हिरा बनली हिरकणी...

Natural Cough Relief for Children: धोकादायक कफ सिरप नकोच..! लहान मुलांना खोकला झाल्यावर 'हा' रामबाण उपाय करा

SCROLL FOR NEXT