mla arjun Khotkar convoy accident on Samrudhi highway dasara melava bkc mumbai  
महाराष्ट्र बातम्या

Arjun Khotkar: दसरा मेळाव्याला निघालेल्या खोतकरांच्या ताफ्यातील गाड्यांचा समृध्दी महामार्गावर अपघात

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : शिंदे गटाकडून बीकेसी मैदानावर दसरा मेळावा घेण्यात येत आहे. दरम्यान दसरा मेळाव्यासाठी मुंबईला निघालेले शिंदे गटाचे आमदार अर्जून खोतकर यांच्या ताफ्यामधील ८ ते १० गाड्यांचा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. दौलताबादजवळ समृध्दी महामार्गावर हा अपघात झाला असून या गाड्या मुंबईच्या दिशेने येत होत्या तेव्हा हा अपघात झाला आहे. परवानगी नसताना या गाड्या मगामार्गवरून नेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

दरम्यान समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनाला अद्याप मुहूर्त मिळाला नाही. नेते मंडळी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी हा महामार्ग खुला केल्यानं आता शिंदे गटावर मोठ्या प्रमाणावर टीका होत आहे.

सर्वसामान्यांसाठी जो महामार्ग बंद आहे त्याच महामार्गावर अर्जुन खोतकर यांच्या कार्यकर्त्यांच्या गाड्या निघाल्या. अर्जुन खोतकर यांच्यासह इतर नेत्यांच्या गाड्यांच्या ताफा दसरा मेळाव्यासाठी मुंबईकडे निघाला होता. तेव्हा दौलताबाद येथे या ताफ्यातील गाड्यांचा हा अपघात झाला. या अपघातात काही कार्यकर्ते जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान उद्घाटन न होता महामार्गावरून गाड्या नेल्याबाबत खोतकर यांच्याशी संवाद साधला असता वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून हा निर्णय घेतल्याचं खोतकर यांनी म्हटलं. तसेच उद्घघाटनापूर्वी गाड्या समृद्धी महामार्गावरून नेण्याची आपली चूक झाल्याचंही त्यांनी मान्य केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PNEUMONIC PLAGUE: रशियातील लॅबमध्ये काम करणाऱ्या तरुणीचा मृत्यू; नक्की काय आहे 'न्यूमोनिक प्लेग'? जाणून घ्या कारणं आणि लक्षणं

Dearness Allowance Hike: कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! व्हेरिएबल डीए वाढला; नेमका किती आणि कोणाला फायदा होणार?

२ केंद्रीय मंत्र्यांचा पत्ता कट होणार, मोदी कॅबिनेटमध्ये फेरबदलाच्या चर्चांना उधाण; ५ जागा रिक्त, आप-शिवसेनेला संधी?

Australia A विरुद्ध सुरु होणार ODI मालिका! हार्दिक, नमनची माघार; तरीही भारताची तगडी फौज मैदानात; जाणून घ्या डिटेल्स

Pune News : मनोज जरांगे यांना प्रश्‍न विचारल्‍याने ट्रोलधाड; रेखा कोंडे यांचा जरांगेंवर आरोप, टेंडर प्रक्रियेवरून मनोज जरांगे यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT