Chandrashekhar Bawankule esakal
महाराष्ट्र बातम्या

'मोदींचे नेतृत्व अन् योगींचे कर्तृत्व यूपीला उंचीवर नेतील'

'आगामी काळात ते राज्याच्या विकासाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतील'

सकाळ डिजिटल टीम

'आगामी काळात ते राज्याच्या विकासाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतील'

उत्तर प्रदेशमध्ये १९८५ नंतर सलग दुसऱ्यांदा विजय मिळवणारा भाजपा हा आघाडीचा पक्ष ठरला आहे. राष्ट्रीय सत्तांतरणाचा पाया म्हणून उत्तर प्रदेशकडे पाहिले जाते. यूपीतील जनतेतेची योगी आदित्यनाथ यांच्यावर श्रद्धा आहे, त्यामुळे आगामी काळात ते राज्याच्या विकासाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतील, असा विश्वास भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे. आज झालेल्या पत्रकार परिषेदेत ते बोलत होते.

ते म्हणाले, राष्ट्रीय सत्तांतरणाचा पाया म्हणून उत्तर प्रदेशकडे बघितले जाते. उत्तर प्रदेशातील जनतेतेची योगी आदित्यनाथ यांच्यावर असीम श्रद्धा आहे. आगामी काळात ते राज्याच्या विकासाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतील. गेल्या पाच वर्षात उत्तर प्रदेशात झालेला विकास, महिला सुरक्षेत झालेली वाढ योगींच्या विजयासाठी महत्वाची ठरल्याचे त्यांनी सांगितले.

पुढे ते म्हणाले, योगी आदित्यनाथ यांच्या कुशल प्रशासनात झालेल्या निवडणुकीचा विजय ऐतिहासिक मानावा लागेल. आमदार बावनकुळे हे योगी आदित्यनाथ यांच्या गोरखपूर मतदारसंघाचे प्रभारी होते. यासंदर्भात विचारले असता ते म्हणाले, गोरखपूरमध्ये योगदान देण्याचे भाग्य लाभले. ही संधी म्हणजे एकप्रकारची गोरक्षनाथ पिठाची सेवा होती. तेथे कसलाही भेदभाव नव्हता. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर जनतेचा विश्वास स्पष्ट दिसून येतो. आजचा विजय हा उत्तर प्रदेशाच्या जनतेच्या विश्वासाचा विजय असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऐनवेळी पायलट का बदलले? मुंबईत CCTVमध्ये काय दिसलं? अजितदादांच्या अपघात प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी सगळंच सांगितंल

Madha News : माढ्याचा आठवडा बाजार आता हायटेक आणि शिस्तबद्ध! कार्यकर्त्यांच्या 'फिल्डिंग'मुळे वाहतूक कोंडीला ब्रेक, महिला व वृद्धांकडून कौतुक

राज्य सरकारची मोठी घोषणा! २६ आणि २७ मार्चला रामनवमीनिमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण कुणाला? जाणून घ्या...

Madha News : माढ्याचा पाण्याचा प्रश्न सुटणार! ५२ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेसाठी नगराध्यक्षा मीनल साठे यांचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना साकडे

कर्नाटकला अधिकारच नाही, ही तर महाराष्ट्राची मानहानी; अजित पवार अपघात प्रकरणी FIR वर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं

SCROLL FOR NEXT