Ajit Pawar 
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar: शरद पवारांच्या गटातील आणखी एक आमदार अजितदादांच्या गळाला

Sandip Kapde

Ajit Pawar: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) राष्ट्रीय अध्यक्षपदावरून हकालपट्टी केल्याची घोषणा केली. अजितदादांनी स्वत:ला नवे राष्ट्रीय अध्यक्षही म्हटले. प्रफुल्ल पटेल यांनी ३० जून रोजी मुंबईत पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावली होती, त्यात हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे.

इकडे दोन्ही गटांच्या नेत्यांनी निवडणूक आयोग गाठला.अजित पवार गटाने 30 जून रोजी आयोगाला पत्र पाठवून राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांच्या निवडणूक चिन्ह घड्याळावर दावा केला होता. तर शरद पवार गटाने देखील आयोगात याचिका केली आहे. दरम्यान संख्याबळ अजित पवार यांच्याकडे जास्त आहे. दरम्यान शरद पवार गटात असलेले आणखी एक आमदार अजित पवारांच्या गटात आले आहेत.

देवेंद्र भुयार यांनी अजित पवार यांनी पाठिंबा दर्शवला आहे. देवेंद्र भुयार हे आधी शरद पवार यांच्या गटात होते. ते अपक्ष आमदार आहे, एबीपी माझाने याबाबत वृत्त दिले आहे.

शरद पवार यांच्यासोबत दिसलेल्या आमदारांमध्ये अनिल देशमुख, रोहित पवार, राजेंद्र शिंगणे, अशोक पवार, किरण लहमटे, प्राजक्ता तनपुरे, बाळासाहेब पाटील, जितेंद्र आव्हाड, चेतन विठ्ठल टोपे, जयंत पाटील, राजेश टोपे, संदीप क्षीरसागर, यांचा समावेश आहे.

याशिवाय शरद पवारांच्या बैठकीला शशिकांत शिंदे, बाबाजानी दुर्राणी, एकनाथ खडसे हे तीन आमदारही उपस्थित होते. या बैठकीला शरद पवार गटाते तीन लोकसभा खासदार आणि दोन राज्यसभेचे खासदारही उपस्थित होते. श्रीनिवास पाटील, सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे हे लोकसभेचे तर फौजिया खान आणि वंदना चव्हाण राज्यसभेचे खासदार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Mhaishale Case Sangli : सांगलीत लपला होता रोहित म्हैशाळे हत्याकांडाचा 'मास्टरमाइंड'; कोण आहे 'गोट्या'? त्याचा दलित महासंघाच्या नेत्याच्या खुनाशीही संबंध?

Bigg Boss Marathi 6 : या आठवड्यात टोळीमधून होणार धक्कादायक एव्हिक्शन ! सगळ्यांना भिडणारी 'ही' स्पर्धक बाहेर

Latest Marathi News Live Update : अकोल्यात काँग्रेसला मोठा धक्का, जिल्हा उपाध्यक्षांचा पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा

Mumbai News: कपडे फाटेपर्यंत मारेन…, महिला ट्रॅफिक पोलिसांसोबत प्रवाशाचे अश्लील वर्तन; मुंबईत नेमकं काय घडलं? VIDEO VIRAL

Vasota Fort Tourism Development : वासोटा किल्ल्याचं रूप पालटलं! आता दरीच्या टोकावर उभं राहून फोटो काढणं होणार सोपं; गडावर वन विभागानं असं काय केलंय?

SCROLL FOR NEXT