Rahul Narvekar Esakal
महाराष्ट्र बातम्या

आमदार अपात्रतेच्या सुनावणीसाठी दिरंगाई होणार नाही; राहुल नार्वेकर यांचं विधान

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - 16 आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरण अनेक दिवसांपासून सुरु आहे. यावर आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी भाष्य केलं आहे. सुनावणी घेण्यात कोणतीही दिरंगाई होणार नाही, असं आश्वासन नार्वेकर यांनी दिलं.

कॉमनवेल्थ पार्लयामेंट्री एसोसिएशनची ९वी सभा ही उदयपूरमध्ये आयोजित करण्यात आले होती. भारतातील सर्व पीठासीन अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. प्रत्येक विधीमंडळात एक वेगळी राजशिष्टाचाराची शाखा निर्माण करण्यात यावी आणि प्रत्येक विधीमंडळाला शासनाकडून निधीची तरतूद सीपीएच्या कामाकरिता उपलब्ध करुन देण्यात यावी अशी मागणी मागणी मी केल्याचं नार्वेकर म्हणाले. त्यावर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सकारात्मक भुमिका घेतल्याचं ते म्हणाले.

आमदार अपात्रेवर नार्वेकर म्हणाले की, आपल्याला सर्वांना माहित आहे की ज्यावेळी विधानसभा अध्यक्ष अपात्रतेच्या संदर्भात निर्णय घेत असतात तेव्हा ते ज्युडिशियल अधिकारी म्हणून काम करत असतात. याचं मला भान आहे. त्यामुळे या संदर्भात अधिक चर्चा न करता योग्य कारवाई आपण करणार आहोत. दरम्यान अपात्रतेबाबत सुनावणी करण्यामध्ये कोणतीही दिरंगाई होणार नाही. योग्य तो निर्णय घेतला जाईल, अस आश्वासनही नार्वेकर यांनी दिलं.

चांद्रयान मोहिमेवर नार्वेकर म्हणाले की, सर्व भारतवासीयांना अत्यंत अभिमान वाटेल असं चांद्रयान मिशन भारताने सुरू केलेलं आहे. देशवासियांना आणि सर्व शास्त्रज्ञांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि ईश्वरचरणी प्रार्थना करतो की ही मोहीम यशस्वीपणे पार पाडून भारताला एक आधुनिक विक्रम करण्याची संधी प्राप्त होवो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Skill University Bill: ग्रामीण रोजगाराला मोठा बूस्ट! कौशल्य विद्यापीठ विधेयक परिषदेत मंजूर; लातूर-पुण्यात नवे विद्यापीठ उभारणार

CJI Surya Kant: चक्क सरन्यायाधीशांच्या भावालाच केला फोन; सीजेआय म्हणाले, जगाच्या पाठीवर कुठेही असला तरी सोडणार नाही...

Lord Ram Descendants : कोण आहेत प्रभू श्रीरामाचे वंशज? आता कुठे आहेत अन् कशा परिस्थितीत जीवन जगतात? पाहा

खरातचा पत्रकाराच्या हत्येशी संबंध असल्याचा आव्हाडांचा दावा, २ आरोपींचा मृत्यू; आरोपींच्या काकांनी दावे फेटाळले

वैभव सूर्यवंशीने CSK ला दिलं आव्हान; Dhoni च्या संघाला मागील पर्वात दोन्ही सामन्यांत हरवलं होतं, IPL 2026 मध्येही...

SCROLL FOR NEXT