MLA Gopichand Padalkar esakal
महाराष्ट्र बातम्या

Dhangar Reservation : ..तर महाराष्ट्रातसुद्धा जाट आंदोलनासारखं धनगर समाजाचं आंदोलन उभा होईल; पडळकरांचा सरकारलाच इशारा

प्रचंड दिरंगाईमुळे समाजाच्या भावनांचा उद्रेक केव्हाही होऊ शकतो.

सकाळ डिजिटल टीम

‘जे आदिवासींना ते धनगरांना’ याप्रमाणे घोषित केलेल्या १००० कोटींच्या २२ योजनांपैकी अनेक योजनांची कसलीही अंमलबजावणी सुरू नाही. शिवाय घोषित केलेला निधीही मिळालेला नाही.

आटपाडी : धनगर समाज आरक्षण (Dhangar Reservation) आणि त्यांच्या योजनेसंदर्भातील प्रश्न संवादाने सुटतील, ही आमची अपेक्षा आहे; मात्र प्रचंड दिरंगाईमुळे समाजाच्या भावनांचा उद्रेक केव्हाही होऊ शकतो. याची दक्षता घेऊन धनगर आरक्षणाची बैठक घ्यावी; अन्यथा महाराष्ट्रातसुद्धा जाट आंदोलनासारखे (Jat Agitation) धनगर समाजाचे आंदोलन उभा होईल, असा इशारा आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्य सरकारला दिला आहे.

यासंदर्भात आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकामध्ये धनगर समाजाच्या आरक्षणाची न्यायालयातील याचिकेत ॲड. कुंभकोणी यांची पुन्हा नियुक्ती कायम करून न्यायालयातील सुनावणी रोज सुरू करण्यासाठी अर्ज करण्याची विनंती केली आहे.

तसेच मेंढपाळांसाठी घोषित केलेल्या दहा हजार कोटींच्या सहकारी महामंडळाची घोषणा करून योजना जाहीर केल्या जाव्यात आणि महामंडळाच्या अध्यक्षाची नियुक्ती करण्याची मागणी केली आहे. ‘जे आदिवासींना ते धनगरांना’ याप्रमाणे घोषित केलेल्या १००० कोटींच्या २२ योजनांपैकी अनेक योजनांची कसलीही अंमलबजावणी सुरू नाही. शिवाय घोषित केलेला निधीही मिळालेला नाही. त्यासाठी तत्काळ बैठक घेऊन आढावा घेण्याची मागणी केली आहे.

मेंढपाळांवर जीवघेणे हल्ले होत आहेत. त्यांच्या संरक्षणासाठी स्वतंत्र कायदा आणला जावा आणि चराई कुरण नाममात्र हेक्‍टरी एक रुपयाप्रमाणे आकारणी करून मेंढपाळांना मेंढ्या चारण्यासाठी देण्याची अंमलबजावणी केली जावी. आरेवाडीतील बिरोबा मंदिराचा विकास आणि भाविकांना सेवा-सुविधा देण्यासाठी तत्काळ २०० कोटींची घोषणा केली जावी.

महाराज यशवंतराव होळकर यांचे जन्मस्थान असलेल्या किल्ला वाफगावच्या विकास संवर्धनासाठी किल्ला ताब्यात घेऊन आराखडा तयार करून तत्काळ अंमलबजावणी केली जावी. औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर नामकरण केले, तसेच नगरचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर असे नामकरण करण्याची मागणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kulhad Fight Mathura Video: कुल्हड युद्ध!, मथुरेत लस्सीवाल्यांमध्ये झाली तुंबळ हाणामारी; व्हिडिओ तुफान व्हायरल

NRC Update India : राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी अद्ययावत करण्याबाबत केंद्र सरकारने लोकसभेत स्पष्ट केली भूमिका!

Swiggy Boy become Deputy Collector : मानलं भावा....! ‘स्विगी’ बॉय बनला थेट डेप्युटी कलेक्टर ; वाचा, सुरजच्या जिद्दीची प्रेरणादायी गोष्ट

Raj Thackeray: राज ठाकरे यांच्या घरी मुंबई पालिका आयुक्तांची भेट, पाऊण तास नेमकी काय चर्चा झाली?

Eknath Khadse : ‘आमच्या कुटुंबीयांच्या बदनामीचे षडयंत्र’; हनी ट्रॅपबाबत मौन का? - एकनाथ खडसे यांचा सरकारला सवाल

SCROLL FOR NEXT