Sharad Pawar vs Mahesh Shinde
Sharad Pawar vs Mahesh Shinde esakal
महाराष्ट्र

बारामतीकरांचं राज्य संपलंय, आता तरी नीट वागा; आमदार शिंदेंचा शरद पवारांना टोला

सकाळ डिजिटल टीम

आमदारच नव्हे, तर शिवसेनेचे खासदार देखील शिंदे गटात सामील झाले आहेत.

सातारा : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे शिवसेनेसोबत (Shiv Sena) बंडखोरी करत बाहेर पडल्यानंतर त्यांना शिवसेनेतील एका मोठ्या आमदारांच्या गटानं पाठिंबा दिला. याच आमदारांच्या पाठिंब्यावर त्यांनी भाजपासोबत (BJP) मिळून सरकार देखील स्थापन केलं. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर शिवसेनेतून शिंदे गटात दाखल होणाऱ्या पदाधिकाऱ्यांची संख्या वाढतच आहे.

आमदारच नव्हे, तर शिवसेनेचे खासदार देखील शिंदे गटात सामील झाले आहेत. दरम्यान, राज्यात फडणवीस-शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर कोरेगावचे बंडखोर आमदार महेश शिंदे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधलाय. उसाची आडवा-आडवी जिरवा-जिरवी करू नका. आता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचं सामान्य जनतेचं, शेतकऱ्यांचं राज्य आलंय, असं आमदार महेश शिंदे (Mahesh Shinde) यांनी म्हटलंय. आता बारामतीकरांचं राज्य संपलंय. हे ध्यानात घ्या आणि नीट वागा, असा सल्ला वजा इशाराही महेश शिंदे यांनी राष्ट्रवादीसह शरद पवार यांना दिलाय.

तडवळे (ता. कोरेगाव) येथील एका कार्यक्रमात आमदार शिंदे बोलत होते. शिंदे पुढं म्हणाले, आमची काय ताकद आहे हे दाखवून दिलंय. त्यांच्या मालकाला पण धोबीपछाड दिलंय. दिवसाच आम्ही चांदण्या दाखवल्या आहेत. आमच्या नादाला लागला तर आम्ही किती बाद करु शकतो हे दाखवायचं काम आम्ही महाराष्ट्रास दाखवून दिलंय. काहीजण म्हणत आहेत महेश शिंदेला पाडणार, पण हा हक्क तुम्ही कधीच गमावलाय. खरंतर मी असला विचार कधीच करत नाही. जनताच तुम्हाला तुमची जागा दाखविणार आहे, असा टोलाही त्यांनी लगावलाय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : भाजपचे दिल्ली तख्त ‘महाराष्ट्र’च खेचणार : उद्धव ठाकरे

Dushyant Chautala: "...तर सरकार पाडण्यास मदत करू," माजी उपमुख्यमंत्र्याने काँग्रेसला पाठिंबा देत वाढवले भाजपचे टेन्शन

"मी माझ्या मुली घेऊन चालले..."; व्हिडिओ पोस्ट करत विवाहितेने जीवन संपवलं, दोन मुलींना दिलं विष

Sam Pitroda: ईशान्य भारतीय चिनी, तर दक्षिणेतील लोक आफ्रिकन लोकांप्रमाणे दिसतात; पित्रोदांच्या वक्तव्याने वादाची शक्यता

Latest Marathi News Live Update : MoCA ने एअर इंडिया एक्स्प्रेसकडून उड्डाणे रद्द करण्याबाबत मागवला अहवाल

SCROLL FOR NEXT