महाराष्ट्र बातम्या

सरकार स्थापनेवेळी शिवसेनेने विमान पाठवलेले आमदारही फुटले, सगळेच सूरतमध्ये

विधाव परिषदेच्या निकालानंतर राज्याच्या राजकारणात अनेक राजकीय नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत

सकाळ डिजिटल टीम

विधाव परिषदेच्या निकालानंतर राज्याच्या राजकारणात अनेक राजकीय नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत.

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी विधान परिषद निकालावर नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे शिंदे हे शिवसेनेसोबत बंडखोरी करणार का अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. दरम्यान, या निकालानंतर आज सकाळपासून राज्याच्या राजकारणात अनेक राजकीय नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत. या सगळ्यात आता एक वेगळी बातमी समोर येत आहे.

अडीज वर्षांपूर्वी सत्ता स्थापन करताना ज्या दोन अपक्ष आमदारांना तातडीने मुंबईत आणण्यासाठी शिवसेनेने चार्टर्ड प्लेन पाठवलेले होते. त्यापैकी एक आमदार सूरतला जाऊन पोहोचला असल्याची माहिती मिळत आहे. हे आमदार शिवसेनेसोबत नाही तर एकनाथ शिंदेच्या बाजूने असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं आहे. भंडारा येथील शिवसेना समर्थक अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर हे काही मिनिटांपूर्वी सूरतच्या हॉटेलमध्ये पोहोचले आहेत.

भाजपाच्या संजय कुटेंसारखीच त्यांचीही कार पोलिसांनी हॉटेलबाहेरच अडवली होती. यानंतर भोंडेकर यांनी आपण शिंदेंचे समर्थक असल्याचे सांगितले आहे. पोलिसांना आतमध्ये फोनाफोनी करून चौकशी केली. शिंदेंकडून जेव्हा होकार आला तेव्हाच त्यांनी भोंडेकर यांना आतमध्ये सोडण्यात आले आहे. राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीतही ते शिवसेनेसोबत होते. मात्र, आता शिंदेंनी बंड केल्याने ते त्यांच्यासोबत गेले असल्याची चर्चा आहे.

दरम्यान, नरेंद्र भोंडेकर हे शिवसेनेचेच आमदार होते. परंतू, जागांच्या वाटाघाटीवेळी २०१९ मध्ये भंडाऱ्याची जागा भाजपाकडे गेली यामुळे भोंडेकर यांनी बंडखोरी करुन जिंकले होते. निवडणुकीनंतरही त्यांनी अपक्ष म्हणूनच शिवसेनेला पाठिंबा दिला होता. २०१९ मध्ये ज्या दोन आमदारांसाठी खास विमान पाठवण्यात आले होते त्यापैकीच एक भोंडेकर होते. दुसरे आशिष जयस्वाल होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात धो-धो! पुढील 48 तास अत्यंत महत्त्वाचे; पुणे-रायगडला 'रेड अलर्ट', मुंबईसह 26 जिल्ह्यांना हवामान खात्याचा मोठा इशारा

Police Transfer: पोलिसांत मोठा फेरबदल! १२५ डीएसपी अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; अनेक जिल्ह्यांना नवे अधिकारी, कुणी घेतला निर्णय?

Pune News: मोठी दुर्घटना टळली! कुसगाव खिंडीत दरड कोसळल्याने राजगड–हवेली मार्गावरील वाहतूक ठप्प; प्रशासनाने तातडीने हटवला अडथळा

Latest Marathi News Live Update : पुण्यात पावसाची संततधार; घाटमाथ्यावर पुढील तीन दिवस ‘रेड अलर्ट’

Pune Water Crisis: पुण्याची पाणीचिंता वाढली! खडकवासला धरणसाखळीतील साठा गतवर्षीपेक्षा पाचपट कमी; केवळ ७६ दिवस पुरेल इतकेच पाणी शिल्लक

SCROLL FOR NEXT